शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मतदान आटोपताच मजुरांची शहराकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

केशोरी : परिसरात औद्योगिक विकासाचा अभाव असल्यामुळे सुशिक्षित युवकांबरोबर मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे येथील बेरोजगार पुणे, मुंबई, नाशिक, ...

केशोरी : परिसरात औद्योगिक विकासाचा अभाव असल्यामुळे सुशिक्षित युवकांबरोबर मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे येथील बेरोजगार पुणे, मुंबई, नाशिक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक येथे जाऊन आपला उदरनिर्वाह करतात. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मजूर गावाकडे आले होते. आता मतदान आटोपताच त्यांनी आपल्या परत जाण्यासाठी वाट धरली आहे.

केशोरी परिसर जंगल वेढलेला असून नैसर्गिक वनसंपतीने नटलेला आहे. वास्तविक नैसर्गिक वनस्पतीपासून औषध निर्मिती करण्यासाठी उपयोग करून औद्योगिक विकास होणे अपेक्षित आहे. परंतु राजकीय मंडळींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अशात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आंधप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह मुंबई, पुणे व नाशिक शहराकडे धाव घ्यावी लागते. सध्या या भागातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक होती व त्यात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते गावाकडे आले होते.

मात्र आता मतदान आटोपताच त्यांनी परत शहरांकडे धाव घेतली आहे. अशाच परत निघालेल्या कुटुंबाची भेट घेऊन संवाद साधला असता त्यांनी, आपल्या परिसरात कोणत्याच प्रकारचे काम नाही. कदाचित रोजगार हमीची कामे सुरू असती तर बाहेर जाऊन भटकंती करण्याचा प्रश्नच उद्‌भवला नसता. आमच्या हाताला कोणत्याही प्रकारची कामे मिळून आमचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. गाव सोडून बाहेर जाण्याची मुळात इच्छा नसते. मात्र नाईलाजास्तव कामाच्या शोधात बाहेर जाणे भाग पडत असल्याचे दु:ख एका सुशिक्षित बेरोजगाराने ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.