प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:23+5:30

या वेळी दिलेले निवेदनातून जानेवारी २०२० च्या मासिक वेतनातून कपात गटविभागाची सेवापुस्तिकेत नोंद करणे, अवघड यादीमध्ये समाविष्ट करणे, एकस्तर वेतन श्रेणी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्यात यावा, गणवेश निधी त्वरीत शाळेच्या खात्यावर जमा करणे, वैद्यकीय व प्रसूती रजेचे प्रकरण, निकाली काढणे, चटोपाध्याय व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव जि.प.ला पाठविणे,उच्च शिक्षा परवानगीचे प्रस्ताव जि.प.ला पाठविणे, हिंदी, मराठी सुट व स्थायीचे प्रस्ताव जि.प.कडे पाठविणे,......

Solve Problems of Primary Teachers | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांना तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्या, यासंबंधीचे निवेदन समितीचे कार्याध्यक्ष टी.आर.लिल्हारे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले.
या वेळी दिलेले निवेदनातून जानेवारी २०२० च्या मासिक वेतनातून कपात गटविभागाची सेवापुस्तिकेत नोंद करणे, अवघड यादीमध्ये समाविष्ट करणे, एकस्तर वेतन श्रेणी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्यात यावा, गणवेश निधी त्वरीत शाळेच्या खात्यावर जमा करणे, वैद्यकीय व प्रसूती रजेचे प्रकरण, निकाली काढणे, चटोपाध्याय व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव जि.प.ला पाठविणे,उच्च शिक्षा परवानगीचे प्रस्ताव जि.प.ला पाठविणे, हिंदी, मराठी सुट व स्थायीचे प्रस्ताव जि.प.कडे पाठविणे, आयकरचे सबंधीत प्रकरण आपले स्तरावर पूर्ण करणे, डिसेंबर २०१९ पर्यंतचे जीपीएफ व डीसीपीएफचे चालान व शेड्यूल जि.प.पाठविणे, मुख्याध्यापकांचा पदभार सेवाजेष्ठ शिक्षकांना देणे, रिक्त पद असलेल्या शाळेतील पदे त्वरीत भरण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.
गटशिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे यांनी सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष एस. बी. दमाहे, कार्याध्यक्ष टी. आर. लिल्हारे, सरचिटणीस जी. सी. बघेले, सहचिटणीस के. टी. ढोलवार, मार्गदर्शक एम. पी. म्यांकलवार, प्रसिध्दी प्रमुख राजकुमार बसोने, डी. एन.गोलीवार, महिला प्रमुख ललीता मच्छिरके, अनिता बोरकर, सुनील बैठवार यांचा समावेश होता.

Web Title: Solve Problems of Primary Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक