शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ३३६ उमेदवारी अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तिकिट जाहीर होईल तेव्हा होईल मात्र अर्ज उचल करण्यासाठी इच्छूक पुढे येवू लागले आहेत. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.३०) चारही विधानसभा मतदारसंघांत २६२ अर्जांची उचल करण्यात आली होती.

ठळक मुद्देगोंदिया मतदारसंघात सर्वाधिक १३६ : सात उमेदवारी अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर निवडणुकीचा जोर अधिकच वाढला आहे. त्यात नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ येत असल्याने इच्छुकांकडून अर्जांची उचल करण्याची संख्याही वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी (दि.१) जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ७४ अर्जांची उचल करण्यात आली. सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण ३३६ उमेदवारी अर्जांची उचल झाली असून एकूण सात अर्ज दाखल करण्यात आले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तिकिट जाहीर होईल तेव्हा होईल मात्र अर्ज उचल करण्यासाठी इच्छूक पुढे येवू लागले आहेत. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.३०) चारही विधानसभा मतदारसंघांत २६२ अर्जांची उचल करण्यात आली होती.त्यात मंगळवारी (दि.१) एकूण ७४ अर्जांची उचल करण्यात आली.यात, (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात १६, (६४) तिरोडा विधानसभा मतदारसंघात २१, (६५) गोंदिया विधानसभा मतदारसंघात ३२ तर (६६) आमगाव विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे.म्हणजेच, आतापर्यंत एकूण ३३६ उमेदवारी अर्जांची इच्छुकांकडून उचल करण्यात आली आहे.शिवाय आतापर्यंत एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये, सोमवारी (दि.३०) गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एक अर्ज दाखल करण्यात आला असतानाच मंगळवारी (दि.१) सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघातून दोन तर गोंदिया विधानसभा मतदारसंघातून चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019