शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उचल संथगतीने, कशी होणार खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट या दोन्ही विभागांना देण्यात आले आहे. मात्र यंदा गोदामे रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ अडीच लाख क्विंटल धानाची उचल : खरेदीसाठी केवळ १५ दिवस शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण ३५ लाख क्विंटल धानापैकी आतापर्यंत केवळ २ लाख ५० हजार क्विंटल धानाची उचल झाली आहे. त्यामुळे गोदाम अद्यापही रिकामे झाली नाही. याचाच परिणाम रब्बी हंगामातील धान खरेदीवर होत आहे. रब्बीच्या धान खरेदीसाठी आता केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून एवढ्या कमी कालावधीत २४ लाख क्विंटल धान खरेदी करणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट या दोन्ही विभागांना देण्यात आले आहे. मात्र यंदा गोदामे रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे. त्यातच गोंधळात १५ दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे उर्वरित पंधरा दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी हाेणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील धानाचे सरासरी उत्पादन सुध्दा जास्त आहे. त्यामुळे ३५ लाख क्विंटलपर्यंत रब्बीतील धानाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र मागील खरीप हंगामातील धान या दोन्ही विभागाच्या गोदामात तसाच पडला आहे. ३५ क्विंटल धानापैकी राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ तीन लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०६ खरेदी केंद्र सुरु केले असले तरी यापैकी प्रत्यक्षात किती केंद्रावर धान खरेदी सुरु आहे याची कल्पना शेतकरी आणि जिल्हावासीयांना चांगलीच आहे. 

शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात - गोदाम हाऊसफुल्ल असल्याने अनेक संस्थांची धान खरेदी ठप्प आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तर घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून ते अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

उद्दिष्ट २८ लाख क्विंटल धान खरेदीचे - जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र १५ जूनपर्यंत केवळ ४ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर गोदाम फुल्ल असल्याने अनेक संस्थांची खरेदी बंद आहे. त्यामुळे उर्वरित १५ दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

२८२ राईस मिलर्ससह करार - जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. यासाठी २८२ राईस मिलर्ससह करार करण्यात आला. या राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ अडीच लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटलवर धान अद्यापही धान खरेदी करणाऱ्या विविध संस्थांच्या गोदामांमध्ये पडला आहे. त्यामुळेच रब्बीतील खरेदी केलेला धान ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड