शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीय २५ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 01:11 IST

श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तिरोडा तालुक्यातील सुकड़ी डाकरामच्या श्री चक्रधर स्वामी देवस्थानात ....

१० वर्षांची परंपरा : सुकडी डाकराममध्ये विनाखर्च लावली जातात लग्नगोंदिया : श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तिरोडा तालुक्यातील सुकड़ी डाकरामच्या श्री चक्रधर स्वामी देवस्थानात पंचमीला (दि.१६) हजारो वऱ्हाडांच्या उपस्थितीत सर्वधर्मिय सामूहिक विवाह समारंभ पार पडला. यावेळी विविध हिंदू, बौद्ध धर्मातील विविध जातींच्या २५ जोडप्यांचे लग्न लावून त्यांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.माजी आ.दिलीप बन्सोड यांच्या पुढाकाराने गेल्या १० वर्षांपासून सुकडीत ही सामूहिक विवाहाची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. श्री चक्रधर स्वामींच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करून समारंभाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.राजेंद्र जैन, भजनदास वैद्य, मधुकर कुकडे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जि.प.सदस्य पंचम बिसेन, माजी उपाध्यक्ष मदन पटले, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, वीणा बिसेन, राधेलाल पटले, अदानी फाउंडेशनचे प्रभारी शिरोडकर, संजय टेंभरे, सुनीता मडावी, डुमेश चौरागडे, अनिता रहांगडाले, जवाहर पटले, अमृतलाल असाटी, गुड्डू असाटी, विलास मेश्राम, सुनील चौरागडे, विशाल शेंडे, प्रेम रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विवाहबद्ध झालेल्या २५ जोडप्यांपैकी ७ बौद्ध समाजाचे तर १८ हिंदू जातीमधील जोडप्यांचा समावेश होता. या जोडप्यांना अदानी फाऊंडेशन व इतर दानदात्यांच्या सहकार्याने प्रत्येकी एक आलमारी, पलंग, गादी आणि जीवनोपयोगी १४ भांडी भेट म्हणून दिलीप बंसोड़, अर्चना बंसोड़, व अतिथिंच्या हस्ते देण्यात आले.