शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘सावली’ देतेय वृद्ध, निराधारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

गोंदिया : ज्यांना इतरांनी नाकारले त्यांना ‘सावली’ने सावरले. ज्या वृद्धांना स्वत:च्या पोराने म्हातारपणी त्यांची काठी न होता नाकारून घरातून ...

गोंदिया : ज्यांना इतरांनी नाकारले त्यांना ‘सावली’ने सावरले. ज्या वृद्धांना स्वत:च्या पोराने म्हातारपणी त्यांची काठी न होता नाकारून घरातून हाकलले, तेव्हा अशा वृद्ध, भिकारी, बेघर, निराधारांसाठी गोंदियातील ‘सावली’ केंद्र मदतीला धावून येत आहे. या केंद्रातील कर्मचारी भिकारी, निराधारांच्या शोधात असतात. आतापर्यंत ‘सावली’ने हजारो निराधारांना अन्न, वस्त्र, निवाराच नव्हे तर रोजगार, आरोग्य, मृतांवर आपल्या आईवडिलांप्रमाणे अंत्यसंस्कार केला आहे; एवढेच नव्हे तर बेघरांना ते आश्रयाची सावली देत आहेत.

‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें; तोचि साधृू ओळखावा, देव तेथेचि जाणावा...’ हा अभंग सर्वच ऐकतात. मात्र, याचा प्रत्यक्ष जीवनात फार कमीजण अवलंब करतात. आपण कुत्र्या-मांजरांचेही लाड करतो, त्यांची काळजी घेतो; पण त्यांना मिळतो तसा साधा तुकडाही ज्यांच्या वाट्याला येत नाही, रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्यांचे पहिले दर्शन होते. अशा भिकाऱ्यांची अवस्था पाहून त्यांना कधी ‘अच्छे दिन’ येतील काय, हा प्रश्न निर्माण होतो. वृद्धापकाळी पोटच्या गोळ्याने नाकारलेल्या बेघर वृद्ध, निराधार आणि भिकाऱ्यांसाठी आता गोंदियातील सावली मदत केंद्र धावून आले आहे. या सावलीने आतापर्यंत हजारो बेघरांना सावली दिली आहे. आतापर्यंत सावलीने शेकडो भिकारी, निराधार, वृद्धांना आपल्या मायेची ऊब देत त्यांना अन्न, वस्त्र, निवाराच नव्हे तर रोजगार देत अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मिळवून दिले. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या अंतिमसमयी पोटच्या गोळ्याने त्यांचे तोंड पाहिले नाही, त्यांच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा सावलीच्या स्वंयसेवकांनी केले. भिकाऱ्यांना निवारा उपलब्ध करून देत त्यांना स्वयंरोजगाराचे धडेसुद्धा देण्याचा प्रयत्न ‘सावली’च्या माध्यमातून केला जात आहे.

........

भिकारीमुक्त शहराचा संकल्प

गोंदियात आज शहराच्या कोणत्याही रस्त्याने जा किंवा चौकात जा; गाडी थांबताच हात पुढे करणारी लहान मुलं, कडेवर मूल असलेल्या स्त्रिया, वृद्ध नजरेस पडतात. कुणी त्यांच्या हातावर काही देतं, कुणी दुर्लक्ष करतं, कुणी खेकसून पुढे निघून जातो. चौका-चौकांत सिग्नलवर एक वेळ पोलीस दिसणार नाहीत; पण भिकारी हमखास दिसतात. वास्तविक भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे; पण अनेक कायदे केवळ कागदावर असतात तसाच हाही एक कायदा आहे. त्यामुळे कायदे कागदावर व भिकारी रस्त्यावर अशी सध्याची स्थिती आहे. मात्र ‘सावली’ने भिकारीमुक्त शहर करण्याचा विडाच उचलला असल्याचे सावलीचे प्रकल्प अधिकारी धनराज बनकर यांनी सांगितले.

.................

कोट

सावलीने आता वृद्ध, भिकारी, बेघरांना संस्कारांचे धडे देत सकाळी योगा, स्वच्छता, वृक्षलागवड, मनोरंजन, इ. बाबीची पूर्तता करीत आयुष्याच्या सरत्या समयी त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे.

- मोहन, लाभार्थी

.............