शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्गांसाठी सात वर्गखोल्या

By admin | Updated: December 31, 2015 01:45 IST

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला तीन पिढ्यांचा वारसा आहे.

इमारत झाली जीर्ण : अनेक विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती नाहीगोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला तीन पिढ्यांचा वारसा आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय नोकरी व इतर उच्च पदावरही आहेत. मात्र सद्यस्थितीत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेची इमारत जीर्ण झाली असून ११ वर्गांसाठी केवळ सात वर्गखोल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय होत आहे.उपसरपंच सोनू पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद चिरेखनी शाळेत वर्ग एक ते पाचपर्यंत एकूण मुलामुलींची पटसंख्या १२४ आहे. तर वर्ग सहावी ते आठवीपर्यंची पटसंख्या १५६ आहे. अशी एकूण २८० मुले-मुली या शाळेत शिक्षण घेतात. येथे वर्ग सहावीच्या ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या आहेत. मात्र शालेय इमारत धोकादायक असल्यामुळे व वर्गखोल्यांचा अभाव असल्याने सदर दोन्ही तुकड्या एकाच वर्गखोलीत बसविण्यात येतात. वर्ग सातवीच्याही ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या आहेत. या दोन्ही तुकड्यातील विद्यार्थी वर्गखोलीच्या अभावामुळे सध्या एकाच वर्गखोलीत अध्ययन करतात. तर वर्ग आठवीच्यासुद्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दोन्ही तुकड्या एकाच वर्गखोलीत बसतात. या तिन्ही वर्गात एकूण सहा तुकड्यांना अध्यापन केले जाते. दाटीवाटीने विद्यार्थी बसत असल्यामुळे शिक्षकांना शिकविताना व विद्यार्थ्यांना शिकून घेताना मोठीच समस्या व अडचण निर्माण होते. मात्र जिल्हा परिषदेकडून अद्यापही वर्गखोल्यांचे बांधकाम व जीर्ण शाळा इमारतीची दुरूस्ती, सुधारणा किंवा नविनीकरण करण्यात आले नाही. चिरेखनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन वर्गखोल्या अत्यंत जीर्णावस्थेत असून धोकादायक आहेत. त्यामुळे जीवितहानीची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तर चार मोठ्या वर्गखोल्या दयनिय अवस्थेत आहेत. या वर्गखोल्यांचे छत कवेलूंचे असून अनेक ठिकाणी कवेलू फुटलेले आहेत. तसेच लाकडे फाटे सडले व तुटलेले आहेत. केवळ तीन वर्ग थोड्या चांगल्या स्थितीत असून तेसुद्धा कवेलूंचेच आहेत.सदर शाळेला एकूण ११ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. सध्या सहा जीर्ण वर्गखोल्या असून आणखी तीन नवीन वर्गखोल्यांची गरज आहे. शैक्षणिक आराखड्यानुसार दरवर्षी याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती तिरोडामार्फत जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात येते. मात्र शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे सदर शाळा नवीन इमारतीपासून वंचित आहे.शालेय इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेला पत्र सादर करण्यात आले होते. २ आॅगस्ट २०१४ रोजी जि.प. गोंदियाचे इमारत धोकादायक असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र नवीन इमारतीचे काम कुठे अडले? हे गुलदस्त्यात आहे. सध्या या जीर्ण व धोकादायक इमारतीमध्येच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही बाब शासन व प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.(प्रतिनिधी)गणित व विज्ञानाचे शिक्षकच नाहीतजि.प. पूर्व माध्यमिक शाळा चिरेखनी येथे सन २०१४-१५ पासून वर्ग आठवी सुरू करण्यात आले. वर्ग आठवीच्या ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या आहेत. परंतु आतापर्यंत गणित व विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांची येथे नियुक्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे एकाच शिक्षकावर अतिरिक्त भार पडत असून विद्यार्थ्यांचे मोठेच नुकसान होत आहे.