शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी संस्थाही झाल्या बेरोजगारच

By admin | Updated: June 18, 2014 00:17 IST

प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार देता येणार नाही. असा दृष्टीकोण समोर ठेवून सामूहिकरित्या अधिकाधिक बेरोजगारांना कामकाज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये

साखरीटोला : प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार देता येणार नाही. असा दृष्टीकोण समोर ठेवून सामूहिकरित्या अधिकाधिक बेरोजगारांना कामकाज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमाने सहायक निबंधक सहकारी संस्थेमार्फत सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या सेवा सहकारी संस्था तयार करण्यात आल्या. मात्र आठ ते नऊ वर्षांचा काळ लोटून सुद्धा नोंदणीकृत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना रोजगार पुरविण्यात आला नाही.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या संबंधात असंवेदनशील असल्याचा आरोप अनेक बेरोजगार युवकांनी केला आहे. गोंदिया जिल्हा राज्याच्या टोकावरील जिल्हा असून या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा आणि अर्जुनी/मोरगाव हे तीन तालुके मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सिमेजवळ आहेत.
जिल्ह्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची फौज दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नोंदणी झालेल्या प्रत्येक बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना रोजगार मिळावा, याकडे सतत डोळेझाक होत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी देखील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्येकडे पाठ फिरविली आहे. रोजगार नसल्याने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. मात्र सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे करून विकास केल्याच्या बोंबा ठोकत आहेत.जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी दारोदारी फिरत असून मिळेल ती नौकरी व रोजगार करण्यास तयार असून त्यांच्या हाताला कामे नाहीत.
जिल्हातील सर्व नोंदणीकृत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल यासाठी अद्यापही कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी केला आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि त्यांच्या नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थांच्या समस्या, झोपेत असलेल्या राज्य शासनाचे लक्षात आणून देण्याचा साधा पाठपुरावा सदर लोकप्रतिनिधींनी केला नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बेरोजगार युवकांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार युवकांनी केला आहे.
देवरी, सालेकसा, अर्जुनी/मोरगाव हे तालुके पूर्णत: नक्षलग्रस्त तालुके आहेत. नक्षल चळवळ फोफावत आहे, या भागात पाहिजे तेवढ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. या तालुक्यांमध्ये तालुक्यात रोजगार उपलब्ध करणारे कसलेही साधन नाही, औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारध नेहमी नोकरीच्या शोधात असतात. रोजगाराचा शोधाशोध घेत मोठ्या शहरात आणि परप्रांतापर्यंत धाव घेतात. नोकरी देण्याच्या नावावर त्यांची फसवणूक केली जाते. मात्र शासन व लोकप्रतिनिधींना याबरोबर काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला आहे.
राज्य शासनांच्या आदेशान्वये अनेक युवकांनी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापित केल्या. प्रत्येक संस्थेत ११ ते २१ पर्यंत सभासद आहेत. सहायक निबंधक कार्यालयातून रितसर नोंदणी करण्यात आली. बँकेत खाते उघडले, व आता सर्वांना रोजगार मिळेल व सुगीचे दिवस येतील असे वाटत होते. मात्र नोंदणी केल्यावर आठ ते नऊ वर्षाचा कालावधी लोटूनही देखील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना रोजगार मिळाला नाही.
एका संस्थेला रोजगार मिळणे म्हणजे ११ ते २१ युवकांना सरळ रोजगार मिळण्यासारखे आहे. मात्र सुशिक्षित बेरोजगारांनी संस्था नोंदणी केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत. मात्र युवकांच्या नोंदणीकृत संस्थांना त्यांचा हक्क मिळू शकला नाही.
नागरिक लोकप्रतिनिधीना आतातरी जागे व्हावे व मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि ग्रामपंचायतला ज्या पद्धतीने काम वाटप केले जातात. त्याच पद्धतीने सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करण्यात यावे, अशी मागणी नक्षलप्रभावी क्षेत्रातील बेरोजगार युवकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन देखील लोकप्रतिनिधीना देण्यात आले सुशिक्षित बेरोजगारांच्या वतीने देण्यात आले आहे. (वार्ताहर)