शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांत गोंदिया राज्यात द्वितीय

By admin | Updated: April 23, 2017 01:43 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल

१ मे रोजी जाहीर करणार नरेश रहिले   गोंदिया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. जिल्ह्यातील केवळ चार शाळा सोडल्यास उर्वरित सर्व जिल्हा परिषद शाळा शासनाच्या अनुदानातून नाही तर लोकसहभागातून डिजीटल करण्यात आल्या आहेत. १०६९ शाळांपैकी १०६५ शाळा आतापर्यंत डिजीटल झाल्या असून २६ एप्रिल रोजी सर्व शाळा डिजीटल होणार आहेत. त्यामुळे १ मे रोजी राज्यातील दुसरा डिजीटल जिल्हा म्हणून गोंदियाला ओळख मिळणार आहे. विज्ञान युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी हवे तसेच त्यांना एका क्लिकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी शासनाने डिजीटल शाळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. या डिजीटल शाळांसाठी अनुदान न देता समाजातील लोकांना भावनिक आवाहन करून त्यांच्या खिशातील पैश्यातून आपापल्या गावातील शाळा डिजीटल करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. या जबाबदारीला पेलवत जिल्ह्यातील १०६५ शाळा डिजीटल झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न सरकारने पाहिले. यासाठी ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा बनविणे, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी), पीएसआर (पब्लिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अशा विविध उपक्रमातून जि.प.च्या शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरू केले. जिल्ह्यातील ३० शाळांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमासंदर्भातील व्हिडीओ दाखविण्याचेही काम केले जात आहे. २४ शाळा होत्या अडसर जिल्हा डिजिटल करण्यासाठी १७ एप्रिल रोजी २४ शाळा अडसर होत्या. त्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्या २४ शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून काय समस्या आहे याची विचारणा केली. दोन दिवसात म्हणजेच १९ एप्रिलपर्यंत समस्या कळवा असे सांगण्यात आले. त्या समस्यांवर तोडगा काढून त्या शाळा डिजीटल करण्याचा मार्ग सुकर केला. त्यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ४ शाळा, गोंदिया तालुक्यातील ४ शाळा आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६ शाळा अश्या २४ शाळा डिजीटल करण्यात सर्व यंत्रणा कामावर लागली. आता फक्त ४ शाळा शिल्लक असून त्याही २६ जूनच्या आत डिजीटल होणार आहेत. या शाळांनी डिजीटल करण्यासाठी साहित्य खरेदी केले, परंतु ते बसविण्यात आलेले नाही. शासनाचा निधी नाही शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचा निधी मिळाला नाही. जि.प. शाळातील विद्यार्थ्यांना आपापल्या गावातील लोकांना भावनिक आवाहन करून तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी शाळा डिजीटल करायची आहे, त्यासाठी मदत करा असे आवाहन केले. त्या आवाहनातून लोकांनी कोट्यवधीच्या घरात पैसे जमा केले. परिणामी जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजिटल होण्यास सुरूवात झाली.