जिल्ह्यात शाळांची घंटा आता ३१ जुलैनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:14+5:30

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे बघता राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यातच जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी वर्ग ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू न करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा आता पुढील आदेशपर्यंत ठोका वाजणार नाही.

School bells in the district are now only after 31st July | जिल्ह्यात शाळांची घंटा आता ३१ जुलैनंतरच

जिल्ह्यात शाळांची घंटा आता ३१ जुलैनंतरच

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : इयत्ता ९, १० व १२ वीचे आॅनलाईन वर्ग, संसर्ग वाढत असल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे बघता राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यातच जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी वर्ग ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू न करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा आता पुढील आदेशपर्यंत ठोका वाजणार नाही.
कोरोनाने राज्यात हाहाकार माजविला असून सर्वच काही अस्तव्यस्त करून टाकले आहे. यातील उद्योगधंदे आता हळूवार सुरळीत होत असतानाच मात्र शिक्षण क्षेत्रात सर्वच काही विस्कळीत झाले आहे. २६ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होत असून कोरोनामुळे त्यातही आडकाठी आली. विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. मात्र हा उपक्रम जास्त दिवस चालविता येणार नसल्याने राज्य शासनाने १ जुलैपासून इयत्ता ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार, जिल्ह्यात शिक्षण विभाग सज्ज होते.
शिक्षण विभागाकडून सर्व तयारी झालेली असताना राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी झाला नाही. शिवाय कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे सर्व चित्र बघता राज्य शासनाने येत्या ३१ जुलैपासून राज्यातील लॉकडाऊन वाढवून दिले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जून रोजी पहिल्या टप्प्यातील इयत्ता ९, १० व १२ वीच्या शाळा पुढील आदेशापर्यंत सुरू न करण्याचे आदेश दिले.त्यानुसार,शिक्षणाधिकाऱ्यांना बुधवारी (दि.१) यासंदर्भात आदेश काढले आहेत.
यामुळे आता पुढील आदेशापर्यंत शाळांचा ठोका वाजणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र असे असताना ऑनलाईन पद्धतीचा वापर करून शैक्षणिक प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी असेही कळविण्यात आले आहे.

सुमारे ६५ शाळा सुरू असल्याची माहिती
इयत्ता ९, १० व १२ वी या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १ जुलैपासून सुरू होणार असे आदेश असल्याने बुधवारी (दि.१) जिल्ह्यातील ६५ शाळा सुरू झाल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांशी संपर्क साधता आला नसल्याने नेमक्या किती शाळा सुरू झाल्या हे सांगणे कठीण आहे. मात्र तरिही ६५ शाळा सुरू झाल्या व त्यात सुमारे ११३१ विद्यार्थी उपस्थित आहे.

निणर्यांने शाळा संचालकांमध्ये संभ्रम
शाळांध्ये वर्ग घेण्यास परवानगी नसताना मात्र शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामे जसे ई-सामग्री, उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन व निकाल घोषीत करणे आदिंना परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळेतील कोणत्याही प्रकारचे वर्ग सुरू करता येणार नाहीत.विशेष म्हणजे उत्तरपत्रिका तपासणी करु न त्यांचे मुल्याकंन आणि निकाल तयार करण्याचे काम शिक्षक करतात. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात इतर कर्मचाºयांकडून ही कामे करुन घ्यावी असे म्हटले आहे. त्यामुळे शाळा संचालकामध्ये यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: School bells in the district are now only after 31st July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.