शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 16, 2014 23:35 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे

गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे या योजनेंतर्गत रोजगारांना कामच मिळत नसल्याने ही योजना आता फक्त नावापुरतीच शिल्लक राहली असल्याची प्रतिक्रिया मजूर वर्गामधून उमटत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी या योजनेंतर्गत विविध कामे आहे. मात्र या कामांवर एकही मजूर काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीची कामे करण्यात येतात. मात्र हे काम करताना किती लोकांना कामे मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात या योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर कामे करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते, सरकारी जमिनीमध्ये वृक्षारोपण, बांध, ग्राम पंचायत रोपवाटिकासह अनेक कामांचा समावेश आहे. मात्र ही सर्व कामे केवळ कागदोपत्रीच सुरू आहेत. या योजनांतर्गत काम करणाऱ्या मजूरांना वेळेवर मजूरी मिळत नसल्यान एकदा काम करणारा मजूर पुन्हा काम करण्यास धजावत नाही. परिणामी या योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटदार हे यंत्राच्या सहाय्याने काम करीत आहेत. यामुळे अधिकारी व पदाधिकारीच संगनमताने या योजनेचा बट्याबोळ करीत आहेत. तालुकास्तरावर या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात येत असले तरी या योजनांतर्गत विहीरींचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यापासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना रसद पुरविता पुरविता शेतकऱ्यांकडे फक्त ४० ते ५० टक्के रक्कम शिल्लक राहते. तर या अधिकारी पदाधिकाऱ्यांना रसद पुरविली नाही. तर त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करीत त्यांना लाभ दिल्या जात नाही. जवळपास ७० टक्केच्यावर को कागदोपत्रीच करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमुळे रोजगारांना काम मिळण्याऐवजी या योजनेतून अधिकारी व पदाधिकारीच मालामाल होत असल्याचे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
आजमितीला जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे जवळपास ८० टक्के बंद आहेत. गोरगरीबांना कामाची आवश्यकता असताना जिल्ह्यात या योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे बंद असल्याने जिल्ह्यातील युवक वर्ग कामाच्या शोधात शहरच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाला त्वरीत प्रारंभ करण्याची मागणी जिल्ह्यातील मजूरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)