शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेगाडीत लूटमार

By admin | Updated: May 3, 2015 01:21 IST

गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सौंदड रेल्वेस्थानकापासून तीन किमी. अंतरावर धावत्या रेल्वेगाडीत व्यापाऱ्यांवर चाकूने हल्ला करुन

गोंदिया : गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सौंदड रेल्वेस्थानकापासून तीन किमी. अंतरावर धावत्या रेल्वेगाडीत व्यापाऱ्यांवर चाकूने हल्ला करुन चौघांनी सव्वापाच लाख रुपयांची रक्कम पळविली. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर गोंदिया व परिसरातील व्यापाऱ्यांसह प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.ब्रम्हपुरी येथील आठवडी बाजारात वसुलीकरिता येथील इलेक्ट्रॉनिक्स सामानाचे ठोक व्यापारी चंद्रभान विरुमल जसुजा, होजीयरी व्यापारी अश्विनी महेंद्रभाई शाहू, कपडा व्यापारी कन्हैय्या रामचंद अनवाणी व एका तेल व्यापाऱ्यांचा मुनीम किशोर ध्यानचंद डंबानी हे गेले होते. दिवसभर वसुली करुन सायंकाळी चंद्रपूर-गोंदिया रेल्वेगाडीच्या बोगी नंबर ११४०६ मध्ये ते बसले. सौंदडपर्यंतचा प्रवास सुरळीत झाला. मात्र त्यानंतर तीन किमी. अंतरावर अचानक तोंडावर रुमाल बांधून चार अज्ञात व्यक्ती चाकू घेऊन शिरले. यातील दोघांनी प्रवाशांना धमकाविले तर दोघांनी व्यापाऱ्यांवर चाकूने हल्ला करून त्यांच्याजवळील सव्वा पाच लाख रुपयांची रक्कम हिसकावली व चेन पुलिंग करुन अंधाराचा लाभ घेत खोडशिवणीच्या जंगलात पळून गेले. दरम्यान रेल्वेगाडी थांबताच गार्डने घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना दिली. ही माहिती गोंदिया शहरात पोहोचताच शहरातील व्यापाऱ्यांनी रात्री ९ वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावर एकच गर्दी गेली होती. रेल्वेगाडी गोंदिया रेल्वेस्थानकावर पोहोचताच जखमी व्यापाऱ्यांवर रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदर प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ३ पथके तयार करुन अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला आहे.