शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याअभावी धानपिक धोक्यात

By admin | Updated: March 6, 2015 01:38 IST

विद्युत वितरण कंपनी देवरी उपविभागाअंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोसंबी, कोल्हारगाव, कोहलीटोला, बानटोला, बकी, मेंढकी, मनेरी आदी गावात मागील काही ...

चिखली : विद्युत वितरण कंपनी देवरी उपविभागाअंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोसंबी, कोल्हारगाव, कोहलीटोला, बानटोला, बकी, मेंढकी, मनेरी आदी गावात मागील काही दिवसांपासून अनियमित विज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याअभावी उन्हाळी धान पिकांना धोका निर्माण झाला आहे. अत्यंत कमी दाबाच्या वीज पुरवठ्याअभावी नळ योजनेच्या मोटारी सुरू होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू झाली आहे. कमीजास्त दाबामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे निकामी झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनियमित विज पुरवठ्याला टाळून नियमित वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी सदर गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पुन्हा शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेवून जि.प. सदस्य जागेश्वर धनभाते, वसंता गहाणे, माधव तरोणे, ईश्वर गहाणे, गुलाब कापगते यांनी सडक-अर्जुनी येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र अधिकाऱ्यांनीही असमर्थता व्यक्त केली. (वार्ताहर)