शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांत मेळाव्याला सखींचा प्रतिसाद

By admin | Updated: February 2, 2016 01:43 IST

लोकमत सखी मंच व आज इंस्टीट्यूट यांच्या संयुक्तवतीने संक्रांतीचे निमित्त साधून शनिवारी (दि.३०) आज सभागृहात संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया: लोकमत सखी मंच व आज इंस्टीट्यूट यांच्या संयुक्तवतीने संक्रांतीचे निमित्त साधून शनिवारी (दि.३०) आज सभागृहात संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गर्ल्स कॉलेजच्या प्रा.माधुरी नासरे, सीमा डोये, सामाजीक कार्यकर्त्या सविता बेदरकर, नगरसेविका भावना कदम, लोकमत इव्हेंटच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, आज इंस्टीट्यूटच्या संचालिका मंजू कटरे उपस्थित होत्या. या मेळाव्यात सखींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात उखाने, फॅशन शो (थिम ब्लॅक),इंट्रोडक्शन राऊंड यांचा समावेश होता. स्पर्धेत सखींनी भाग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे मराठी भाषी महिलांसह हिंदी भाषी महिलांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रा.नासरे यांनी, महिलांना मकर संक्रांती व त्याचे महत्व याबद्दल माहिती दिली. तर मंजू कटरे यांनी, गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या मधात असल्याने हिंदी संस्कृती व हिंदी भाषेचा प्रभाव इकडे दिसतो. पण असा स्पर्धांकडे मराठी भाषींसहीत हिंदी भाषी लोकांनाही मराठी संस्कृतीची ओळख होत असल्याचे सांगीतले. दिव्या भगत यांनी, लोकमत सखी मंचच्या माध्यमातून वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या मेळाव्यात सखींसह प्रेक्षकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व त्यात त्यांनी उत्सफुर्तपणे भाग घेतला होता. प्रास्तावीक दिव्या भगत यांनी केले. संचालन काव्या केहता व दिपीका ससानी यांनी केले. आभार मंजू कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रविना पराते, नेहा करमकर यांच्यासह अन्य सखींनी सहकार्य केले. सखींचे हळदीकुं कू देवरी: येथील आफताब मंगल कार्यालयात सखींचा हळदीकुंकू कार्यक्रम नुकताच थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे निमित्त साधून सखींसाठी फँसी ड्रेस ्स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरूवात सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुमन बिसेन, माया निर्वाण, कोकीळा दखने, नगरसेवीका उषा शहारे, सामाजीक कार्यकर्ता सविता बेदरकर, लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका शिप्रा तिराले उपस्थित होत्या. कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या व त्यात ममता इरदंडे यांनी प्रथम, मयुरी पारधी यांनी द्वितीय तर रोहीनी कावळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान हळदीकुंकू व वाण देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संचालन स्मिता पिल्लेवार व सोनिया मारे यांनी केले. प्रास्तावीक लोकमत सखी मंच संयोजिका शिप्रा तिराले यांनी मांडले. आभार ममता इरदंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)