शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:20 IST

येथील वीज वितरण कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : येथील वीज वितरण कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महावितरणचे गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी, गोंदिया प्रविभागाचे अधिक्षक अभियंता एल.एम.बोरीकर यांच्या मार्गदर्शनात देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे, सालेकसा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.गजभिये, साखरीटोला विज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आर.डी.पाटील उपस्थित होते. या ग्राहक तक्रार निवारण शिबिरात जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करुन त्यांच्या तक्रारी मांडण्यात आल्या. तक्रारीचे निवारण वेळेवर होत असल्यास त्वरीत निकाली काढण्यात आले. वीज ग्राहकांनी या शिबिरात साखरीटोला व इतर गावातील बील दुरूस्ती, नवीन वीज कनेक्शन, सोलर उर्जा नवीन कनेक्शन, नवीन विद्युत खांबासंदर्भात तक्रारी मांडल्या. या तक्रारींबाबत सर्वाचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करुन त्वरीत दुरध्वनी संदेश देण्यात आले. तक्रारींचे जागेवरच मीटर देऊन त्वरीत निराकरण करण्यात आले. ग्राहक तक्रार निवारण शिबिरात येथील कनिष्ठ अभियंता आर.डी.पाटील यांनी शासनाच्या सर्व योजनांबाबत माहिती दिली. वीज बिल वेळेवर भरणे, आपले वीज मीटर सुरक्षित ठेवणे ही आपली स्वत:ची जवाबदारी आहे. वीजचोरी कुणीही करू नये वीज चोरीमुळे घरातील अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पोलीस तक्रार झाली आहे. वीज चोरी करु नये व स्वाभीमानाने जगावे असे याप्रसंगी उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.