दिंडीतून व्यसनमुक्तीवर जनजागृती

By Admin | Updated: February 9, 2016 01:32 IST2016-02-09T01:32:39+5:302016-02-09T01:32:39+5:30

जमाकुडो ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, श्री गुरूदेव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.६) गावात दिंडी काढून व्यसनमुक्तीवर जनजागृती केली.

Public awareness on addiction from Dindam | दिंडीतून व्यसनमुक्तीवर जनजागृती

दिंडीतून व्यसनमुक्तीवर जनजागृती

जमाकुडो येथील प्रयोग : विद्यार्थी व शिक्षकांसह पालकांचा सहभाग
दर्रेकसा: जमाकुडो ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, श्री गुरूदेव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.६) गावात दिंडी काढून व्यसनमुक्तीवर जनजागृती केली. अधीन येणारे गावच्या शाळेच्या हजाराच्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी ने व्यसनमुक्त गाव व्हावा, जसे दारुबंदी, मटकाबंदी, गुटखा बंदी आणि भु्रणहत्या थांबविण्याकरिता ६ फेबु्रवारीच्या सकाळी ९ वाजता शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा दरेकसा आणि श्री गुरुदेव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दरेकसाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक व गावातील लोक सहभागी होऊन जनजागरण दिंडी गावातून काढण्यात आली.
जनजागरण दिंडीचे आयोजन ग्राम जमाकुडो येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, बचत गटातील महिला व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता निघालेल्या दिंडीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, बचतगटातील महिलांनी भाग घेतला होता.
याप्रसंगी दिंडीला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नंतर दिंडी गावातील प्रत्येक गल्लीत गेली व घोषवाक्यांतून व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्यात आली. दिंडीसाठी प्राचार्य रहांगडाले, ग्रामसेवक बोरकर, सरपंच मधुकर ओक्टे, भीमराव मोहबे, आश्रमशाळेतील लेनेकर, बन्सोड, शहारे, उताने, बांगरे, मनोज विश्वकर्मा, बालमुकुंद शेंडे, ग्राम पंचायतील सर्व सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष रंभा वाहणे व गावातील इतर लोकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Public awareness on addiction from Dindam