वीज बिलाची होळी करुन नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:36+5:30

भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ५० रु पये अनुदान, शासनाकडून ३० रु पये प्रति लीटर दराने गायीच्या दुधाची खरेदी करण्यात यावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Protest registered on Holi of electricity bill | वीज बिलाची होळी करुन नोंदविला निषेध

वीज बिलाची होळी करुन नोंदविला निषेध

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने : वीज बिल माफ करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना नावे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संंक्रमनामुळे राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये अवाजवी दरवाढ करण्यात आली आहे. हा सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड आहे. भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ५० रु पये अनुदान, शासनाकडून ३० रु पये प्रति लीटर दराने गायीच्या दुधाची खरेदी करण्यात यावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
तिरोडा : तालुक्यातील दवनीवाडा मंडळ येथे आ.विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, बाजार समिती सभापती चितांमन रहांगडाले, अशोक रिनायत, अजाबराव रिनायत, सुरेश पटले, महेंद्र बघेले, हितेंद्र लिल्हारे, सुंदर अग्रवाल, राजेश उरकुडे, बंटी श्रीभात्री, गौरी बिसेन, महेंद्र कटरे, नेहरु उपवंशी, परमानंद मेश्राम, आत्माराम दसरे, ममता जतपेले, सोनू चौरागडे उपस्थित होते.
सालेकसा : सालेकसा येथे वनविभागासमोरील चौकात तालुकाध्यक्ष गुणवंत (मुन्ना) बिसेन यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी सुनील अग्रवाल, राजेंद्र बडोले, यादन नागपुरे, प्रतिभा परिहार, मधू अग्रवाल, देवराम चुटे, टिना चुटे, आदित्य शर्मा, खेमराज लिल्हारे, रामदास हत्तीमारे, आर.डी.रहांगडाले, बाबा तुरकर, संजय कटरे, गादीप्रसाद भगत, बाबा परिहार, हेतराम शहारे, भिमा बोहरे, पृथ्वी शिवणकर, राजेंद्र वालदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
गोंदिया : येथे जिल्हा भाजप कार्यालयसमोरील चौकात माजी आ. रमेश कुथे यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, प्रफुल्ल अग्रवाल, नगरसेवक दिलीप गोपलानी, योगराज रहांगडाले, मिनू बडगुजर, शंभुशरणसिंह ठाकूर, अशोक चौधरी, अशोक जयसिंघानिया, मनोज मेंढे, राजा कदम, सुरेश चंदनकर, अमृत इंगळे, चंद्रभान तरोणे, मोंटू पुरोहित, गोल्डी गावंडे, विनोद चांदवानी, सुशिल राऊत, पारस पुरोहित, धमेंद्र डोहरे, राजेश चौरिसया, बबली ठाकूर, मिलिंद बागडे, मंगलेश गिरी आदी उपस्थित होते.
अर्जुनी मोर. : येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर, तालुका महामंत्री भोजू लोगडे, नुतन सोनवाणे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मंजुषा तरोणे, केवळराम पुस्तोडे, उमाकांत ढेंगे, रामदास कोहाटकर, रघुनाथ लांजेवार, डॉ. गजानन डोंगरवार, डॉ.नाजुकराव कुंभरे, चामेश्वर गहाणे, व्यकंट खोब्रागडे, डॉ. वामन ब्राम्हणकर, रामू केशरवानी, गिरीश बागडे, मुरलीधर ठाकरे, होमराज ठाकरे, रत्नाकर बोरकर, संदिप कापगते, विजय कापगते, रामलाल मुंगणकर, लैलेश शिवणकर, होमराज पुस्तोडे, रमेश मस्के, दिपंकर उके उपस्थितीत होते.

Web Title: Protest registered on Holi of electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.