‘त्या’ भ्याड हल्ल्याचा निषेध ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:06+5:302021-09-02T05:03:06+5:30

अर्जुनी मोरगाव : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा स्थानिक नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी ...

Protest against 'that' cowardly attack () | ‘त्या’ भ्याड हल्ल्याचा निषेध ()

‘त्या’ भ्याड हल्ल्याचा निषेध ()

अर्जुनी मोरगाव : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा स्थानिक नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एक दिवस काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

सोमवारी सहाय्यक आयुक्त पिंपळे यांनी फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. यात त्यांची बोटे कापण्यात आली. फेरीवाल्यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा संघटनेच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त केला. मंगळवारी स्थानिक नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून जाहीर निषेध केला. एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांना निवेदन देण्यात आले.

310821\img-20210831-wa0003.jpg

भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करतांना नगरपंचायत कर्मचारी

Web Title: Protest against 'that' cowardly attack ()