शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता पशीनेंवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध

By admin | Updated: June 23, 2014 23:56 IST

विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशिने यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या विनयभंग व एट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने निषेध व्यक्त केला.

गोंदिया : विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशिने यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या विनयभंग व एट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने निषेध व्यक्त केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२३) द्वारसभा घेऊन २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
२० जून रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशीने, सहकारी कर्मचारी श्रीकृष्ण सांगोळे व ढेगंळे हे लाईनचे ब्रेक डाऊन करुन येत असताना कुडवा येथील चंद्रकांत सुर्यवंशी यांचे घरी डायरेक्ट हूक टाकून विजेचा वापर होत असल्याचे त्यांचे दिसले. यावर पशीने यांनी आपल्या सहकाऱ्यांना हुक काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी कारवाई पुर्ण केली व पशीने सहकाऱ्यांसह जय अंबे हॉटेल समोर आले. दरम्यान सुदाराम राव, रुपाली उईके, चंद्रकांत सुर्यवंशीसह इतरांंनी धक्का बुक्की करून पशीने व सहकाऱ्यांना मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली.एवढेच नव्हे तर रुपाली उके यांनी पशीनेंवर घरी येवून विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशन येथे दाखल केली.
व्ही.पी. पशीने यांनी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या घरचे डायरेक्ट लागलेले हुक काढल्यामुळे विनयभंग व अनुसुचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन व्ही.पी. पशीने यांना अटक करण्यात पोलिसांना बाध्य केले. यावर महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने रामनगर कार्यालयात सोमवारी (दि.२३) द्वारसभा घेऊन पशीने यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई व अटकेचा निषेध व्यक्त केला.
विशेष म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या द्वार सभेत घेण्यात आला. या द्वारसभेला हरीश डायरे, अभय मेश्राम, एस.एस. फुंडे, वाय.आर. सोनुले, दिगंबर कटरे, राजू बोंदरे, काका कावरे, एस.एस. पांडे, जुमडे, अरुण दशपुत्रे, ताराचंद कुंभलकर, सुनिल रेवतकर, एस.जी. जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)