शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ

By admin | Updated: June 23, 2014 23:55 IST

पालिकेच्या शाळांमधील पटसंख्येची घरसण होऊन खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ ठरत आहेत. पालिकेच्या शाळांची यामुळे अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.

१०० टक्के निकाल नाही : माताटोली शाळेचा सर्वात कमी ५६ टक्के निकाल
गोंदिया : पालिकेच्या शाळांमधील पटसंख्येची घरसण होऊन खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ ठरत आहेत. पालिकेच्या शाळांची यामुळे अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. पटसंख्येच्या बाबतीत खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर मात करीत असतानाच आता निकालातही खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर भारी पडत आहेत. यंदा दहावीच्या निकालात शहरातील खाजगी शाला १०० टक्के निकाल देत असतानाच मात्र पालिकेच्या एकाही शाळेने १०० टक्के निकालाचा टप्पा गाठलेला नाही.
शहरातील खाजगी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरत असतानाच पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती दिसून येते. विद्यार्थी पटसंख्येअभावी पालिकेला आपल्या शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. मात्र एवढे होऊनही पालिकेच्या शाळांत काही बदल झालेला नाही. तोच कारभार व तीच पद्धती आजही पालिकेच्या शाळांत राबविली जात आहे.
दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात शहरातील साकेत पब्लीक स्कूल, निर्मल स्कूल, विवेक मंदिर, गणेशन स्कूल, जानकीदेवी चौरागडे शाळा, मिलीटरी स्कूल, राजस्थान शाळा, संस्कार हायस्कूल आदिंनी १०० टक्के निकाल दिला. तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या पाच पैकी एकाही शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला नाही.
आकडेवारीसह बघितले असता मनोहर म्युनिसिपल लोअर सेकंडरी गोविंदपूर शाळेतील १२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ७२ टक्के निकाल लागला आहे. रामनगर म्युनिसिपल शाळेतून ३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ६५ टक्के निकाल लागला आहे.
मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी शाळेतून १६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ८३ टक्के निकाल लागला आहे. एस.एस.गर्ल्स स्कूलमधून १०८ विद्यार्थीनींनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातून ८५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा ८० टक्के निकाल लागला आहे .
तर माताटोली शाळेतून ४१ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली असून त्यातील २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या शाळेचा सर्वात कमी ५६ टक्के निकाल लागला आहे. वरील आकडेवारी बघता पालिकेच्या शाळांवर शहरातील खाजगी शाळा १०० टक्के निकाल देऊन वरचढ ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)