खासगी युवकांकडून वीज कामे

By Admin | Updated: November 10, 2014 22:45 IST2014-11-10T22:45:41+5:302014-11-10T22:45:41+5:30

विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे.

Power workers from private youth | खासगी युवकांकडून वीज कामे

खासगी युवकांकडून वीज कामे

काचेवानी : विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे. असेच एक प्रकरण विद्युत वितरण कंपनी गंगाझरी शाखेंतर्गत घडले. एक युवक विद्युत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खांबावर चढला व खाली आदळून गंभीर जखमी झाला. शुद्ध हरवलेल्या त्या युवकाला एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोंदियाला हलविण्यात आले. मात्र या प्रकरणाची तक्रार पोलिसांत देण्यात आली नाही.
खांबावरून पडलेल्या या जखमी युवकाची कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी दखल घेवून पोलिसात तक्रारही केली नाही. या प्रकाराला भ्रष्टाचाराचे गालबोट तर लागले नाही, याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे. या प्रकरणाची माहिती नसल्याचे ते सांगतात. पण आकडे लावणे, वीज चोरी करणे या बाबींची ते माहिती घेतात. या गंभीर बाबीची माहिती त्यांना नसणे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१६ आॅक्टोबच्या सकाळी १०.३० वाजता कनिष्ठ अभियंता चवरे यांनी कंत्राटी कर्मचारी सुरेश पारधी यांना बरबसपुरा या गावी दुरूस्तीसाठी पाठविले. यावेळी गावातील धर्मराज पुनाजी चौधरी शेतातून येत असताना सदर कर्मचाऱ्याने त्यांना खांबावर (बी-६) चढायला लावले. त्यापूर्वी खांबावरील वीज बंद करण्यात आली नव्हती. चौधरी खांबावर चढले व खाली सिमेंटच्या नालीत आदळले. त्यावेळी विद्युत खांबाचा अर्थिंग तार तुटला. या घटनेत धर्मराज चौधरी यांना तोंडाच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली व त्यांची शुद्ध हरपली. त्यांना एकोडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यानंतर त्यांना गोंदियाला हलविण्यात आले.
या प्रकाराची माहिती होताच काही गावकऱ्यांनी उपचारावेळी सहकार्य केले. कनिष्ठ अभियंता चवरे हेसुद्धा एकोडीत आले व पाहणी केली. मात्र त्यांनी गावकऱ्यांना पोलिसात तक्रार न देण्याची विनंती केली. उपचाराचा खर्च पारधी नामक कर्मचारी भरण्याच्या तयारीत असल्याने गावकरी शांत झाले. ही घटना भर गावातील असून जखमी धर्मराज चौधरी यांनी आपण झाडावरून पडल्याची खोटी माहिती रूग्णालयात सांगितली. त्यांनी ही माहिती सांगितली नाही, अशी चर्चा आहे.

Web Title: Power workers from private youth