शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदी मोहिमेतून १.६५ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही.

ठळक मुद्देसुमारे अडीच टन साहित्य जप्त : नगर परिषद पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करताना नगर परिषदेच्या पथकाने शहरात ३३ कारवाया करून प्रत्येकी प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे, बंदी लावण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिकमध्ये येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांचा अतिरेकी वापर सर्वात जास्त हानीकारक ठरत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरिही त्याचे परिपूर्ण अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.प्लास्टीक बंदी अंतर्गत नगर परिषदेने २५ जून २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विशेष मोहीम राबवून प्लास्टीक विक्रे ते दुकानदारांवर कारवाई केली. नगर परिषदेच्या या मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २१६ दुकानदारांवर धाड घालून त्यांच्याकडील प्लास्टिक जप्त केले आहे.याशिवाय ३३ कारवायांतून प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे नगर परिषदेने या मोहिमेतून २.४२५ टन प्लास्टीक साहित्य जप्त केले आहे. यातमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल शिट, थर्माकोल प्लेट्स व अन्य भांडे याशिवाय बंदी असलेल्या साहित्यांचा समावेश आहे.ट्रान्सपोर्ट कंपनीतून १.५० टन माल जप्तनगर परिषदेने शहरात कित्येक दुकानांतील प्लास्टिक साहित्य जप्त करून त्यांना दंड ठोठावला आहे. मात्र सर्कस मैदान जवळील गोंदिया फ्रेट कंपनी या ट्रान्पोर्ट कंपनीतून पथकाने धाड घालून १.५० टन प्लास्टिक साहित्य जप्त केले होते. तसेच ही त्यांच्यावरील पहिली कारवाई असल्यामुळे त्यांना पाच हजार रूपयांचा दंडही ठोठावला होता.पुन्हा सुरू झाली जनजागृती मोहीमराज्यात आलेल्या नव्या शासनातील पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी प्लास्टीक वापराचा हा विषय गांभीर्याने घेतला असून सिंगल यूज प्लास्टिक मुक्त राज्य बनविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यांतर्गत सर्व नगर पालिका, महानगरपालिका, नगर पंचायतींना नव्याने प्लास्टिक बंदीसाठी मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नगर परिषदेने पुन्हा मोहीम छेडली असून प्लास्टिक वापरू नये याबाबत व्यापाऱ्यांना भेटून जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी