शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीची वाटचाल विकासाकडे

By admin | Updated: February 8, 2015 23:34 IST

खा. प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम पाथरी येथे रविवारी ८ फेब्रुवारीला अदानी फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान व कलापथकाच्या

गोंदिया : खा. प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम पाथरी येथे रविवारी ८ फेब्रुवारीला अदानी फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान व कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आदर्श ग्राम पाथरी येथे विविध उपक्रम राबवून आदर्शतेच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने गावात आनंददायी वातावरण दिसून येत आहे.अध्यक्षस्थानी आ. राजेंद्र जैन होते. अतिथी म्हणून अदानी पॉवर प्लाँटचे सी.पी. शाहू, आॅपरेशन हेड समीर मित्रा, समन्वयक सुबोध सिंग, डीजीएम ए.पी. सिंग, गौरव नायडू, सहायक संजय मिश्रा, विजय नंदनवार, भागेंद्र नायडू उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पाहुण्यांच्या हस्ते ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावाचा सर्वांगिण विकास साधून सांसद आदर्श ग्राम पाथरीचे नाव देश पातळीवर उंचावू, अशी ग्वाही आ. राजेंद्र जैन यांंनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली. खा. प्रफुल्ल पटेल यांनी निवड केलेल्या सांसद ग्राम पाथरी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे अदानी पॉवर प्लांटचे सी.पी. शाहू यांनी सांगितले.पाथरी गावात लिफ्ट इरिगेशन, शाळेला संरक्षण भिंत, १८ हातपंप, शौचालय, दोन धोबीघाट आदी कामांची खासदार व आमदार फंडातून मंजुरी मिळवून सुरुवात झालेली आहे. शाळेला संगणक संच व इतर कामे अदानी फाऊंडेशनच्या सहकार्याने होत आहेत.संचालन ग्रामसेवक सी.ए. रहांगडाले तर आभार केवलराम बघेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरपंच आशा खांडवाये, उमाकांत चन्ने, पाणलोट व्यवस्थापन अध्यक्ष सचिन बिसेन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जियालाल कटरे, मूलचंद खांडवाये, पोलीस पाटील सोमराज बघेले, गोपीचंद भोयर, राजेंद्र राऊत व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)