शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षापासून रखडले १२८९ घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतील एकूण एक हजार २८९ घरकूल मागील पाच वर्षांपासून अडकून आहेत. त्यांना घरकुल बांधकामाचा निधी देण्यात आला नाही. आज-उद्या निधी मिळेल या आशेवर लाभार्थी फख्त कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.

ठळक मुद्देजि.प. सदस्यांचा पाठपुरावा : सडक-अर्जुनी तालुक्यातील लाभार्थी आशेवरच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतील एकूण एक हजार २८९ घरकूल मागील पाच वर्षांपासून अडकून आहेत. त्यांना घरकुल बांधकामाचा निधी देण्यात आला नाही. आज-उद्या निधी मिळेल या आशेवर लाभार्थी फख्त कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.सन २०१५-१६ या वर्षातील इंदिरा आवास योजनेतील ७०, सन २०१७-१८ वर्षातील १०२, सन २०१८-१९ वर्षातील ११० घरकुलांचे काम झाले नाही. सन २०१६-१७ वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३४, सन २०१७-१८ वर्षातील ५६, सन २०१८-१९ वर्षातील ११६, सन २०१९-२० वर्षातील ७७८ घरकुलांचे काम झाले नाही. सन २०१६-१७ वर्षातील शबरी आवास योजनेतील दोन, सन २०१७-१८ वर्षातील ११, सन २०१८-१९ वर्षातील २० घरकुलांचे काम झाले नाही. अशाप्रकारे चारही योजनांतील एक हजार २८९ घरकुल पूर्ण झाले नाही.या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने हे कुटुंब उघड्यावर आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सतत पाठपुरावा केला आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत अनेकदा प्रश्न उपस्थिततरून लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे.दोषींवर कारवाई करागोरगरिबांसाठी या योजना राबविल्या जातात. अन्न, वस्त्र व निवारा यापासून कुणीही वंचीत राहू नये म्हणून शासनाची धडपड दिसून येते. परंतु जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना गरजेनुसार घरकुल मंजूर होऊनही त्यांना निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी ज्या ठिकाणी घरकुलाचा पाया उभा करण्यात आला ती जागाही गुंतून आहे. अशात संबंधितांवर कारवाई करा अशी मागणीही परशुरामकर यांनी केली आहे.