शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

प्रवाशांना २१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के.वी.रमणा यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल .....

ठळक मुद्देरेल्वे विभागाचे विशेष तिकिट तपासणी अभियान : ८८४७ प्रकरणांची केली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विना तिकीट रेल्वेत प्रवास करणाऱ्यांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी ९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाकडून राबविण्यात आले. यात ८८४७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून प्रवाशांना २१ लाख २९ हजार ३१५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के.वी.रमणा यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या मदतीने ९ ते २२ फेबु्रवारी दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले.यामध्ये बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे एक हजार १६८ प्रकरण हाती लागले. ज्यामध्ये संबंधितांकडून सहा लाख ४० हजार ५६५ रूपये दंड वसुल करण्याात आला.त्याचप्रकारे अनियमीत तिकीटांचे दोन हजार ५३० प्रकरण पकडण्यात आले. ज्यामध्ये संबंधितांकडून नऊ लाख ६३ हजार ८२५ व बिना माल बुक करून सामान ठेवणाऱ्यांचे पाच हजार १४९ प्रकरण पकडून त्यांना पाच लाख २४ हजार ९२५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.अशाप्रकारे १४ दिवस राबविण्यात आलेल्या या विशेष अभियानात एकूण आठ हजार ८४७ प्रकरणांत रेल्वेने २१ लाख २९ हजार ३१५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कचरा फेकणाऱ्यांनाही दिला दणकादेशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असून आपल्या सारखेच आपण वावरत असलेला परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात असून स्वच्छता हाच उत्तम आरोग्याचा मंत्र म्हणून जनजागृती केली जात आहे. अशात मात्र कित्येकांना स्वच्छतेची पथ्य दिसते. अशात कचरा फेकणाऱ्या १०१ प्रकरणांत या विशेष अभियानंर्तत १० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे