शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेती अभ्यास दौरा

By admin | Updated: June 19, 2014 00:08 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी आराखड्यांतर्गत सेंद्रीय शेती कार्यक्रम सन २०१३-१४ मध्ये एकूण १० गावांमध्ये राबविण्यात येत असून सेंद्रीय शेती दौरे केले जात आहेत.

२५ शेतकऱ्यांचा सहभाग : शेतकऱ्यांनी गिरविले सेंद्रीय शेतीचे धडे
सडक/अर्जुनी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी आराखड्यांतर्गत सेंद्रीय शेती कार्यक्रम सन २०१३-१४ मध्ये एकूण १० गावांमध्ये राबविण्यात येत असून सेंद्रीय शेती दौरे केले जात आहेत.
अन्नपूर्णा कृषी विज्ञान मंडळ खजरी व ग्रामीण बहु. शिक्षण संस्थेच्यावतीने गट समूह संघटन करणे, गांढुळ खत उत्पादन युनीट बांधकाम, बायोडायनामिक कम्पोस्ट, शेतीशाळा व शेतकरी अभ्यास दौरा इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे तसेच किटक नाशकांच्या वापराने जमिनीतील पिकांना आवश्यक असणारे जिवाणू नष्ट होत आहे. परिणामी जमीन सुपीक होण्याऐवजी नापिकीकडे वळत आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती व जैवीक शेतीचे महत्व कळावे यासाठी कृषी विभागातर्फे राज्यांतर्गत २५ शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सेंद्रीय शेती अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांची भेट देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राला देण्यात आली. अनुसंधान केंद्र देवलापार येथे शेतकऱ्यांना गोबर गॅस, जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत, अमृतपाणी व शेण आणि गोमूत्र यापासून बनविलेल्या विविध औषधी बाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करून जमीनीचे आरोग्य टिकवावे. किटकनाशकांचा अति वापर टाळून पिकांवर व माणवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळून पोषक पिक काढण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एफ.आर.टी.शहा यांनी केले.
अभ्यास दौऱ्यात संस्थेचे सचिव माधुरी पाथोडे, कृषीमित्र पुष्पमाला बडोले, कृषी सहाय्यक आर.एच.मेश्राम, प्रकाश साखरे, अमीत बडोले, मुरलीधर राऊत, रविंद्र मंडारी, माधोराव सोनवाने, गीता पटले इत्यादी २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी एफ.आर.टी.शहा यांनी दौऱ्याचे यशस्वी आयोजन केले. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्यात उपस्थित शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती संबंधी अभ्यास करून त्यात आवड दाखविली. याचा नक्कीच पुढे लाभ मिळणार असल्याचे मत पेशट्टीवर यांनी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)