शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील पदार्थ देत आहेत आजाराला आमत्रंण

By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST

पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना

गोंदिया : पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना आपण कदाचीत आजाराला आमत्रंण देत आहोत, ही बाब विसरतो. यामुळेच पावसाळ्यात उघड्यावरील पदार्थांच्या सेवनामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात कावीळ, अतीसार, कॅलरा व पोटाच्या आजारांची लागण होते. यालाही काही प्रमाणात अस्वच्छता व उघड्यावरील पदार्थांचे सेवन कारणीभूत आहे. नागरिक देखील आपल्या धावपळीत व हौस भागवायची म्हणून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचे सर्रासपणे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून व स्वच्छतेबाबत नियमांचे पालन केले जाते आहे की नाही याची खबरदारी घेत नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुकानातून केवळ १० रुपयात घेतलेला नास्ता आजाराला आमत्रंण देऊ शकतो या बाबीकडे नागरीक दुर्लक्ष करीत असतात यातूनच आपण या विविध आजारांना आमत्रंण देत असतो.
जिल्ह्यात शेकडो हॉटेल व रेस्टॉरेंट आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल व उपहारगृहांना परवाने देताना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन हॉटेल व उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येतो. नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम २७४, २७५ नुसार खानावळ, उपहारगृह, हॉटेल चालविणाऱ्या संचालकाकडून केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्यांच्यावर या कलमान्वये कारवाई करण्याची तरतुद आहे. इंडियन पिनल कोड च्या कलम ७२ व ७३ नुसार खराब मिठाई व मानवी शरिरास अपायकारक असणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. हे नियम जरी असले तरी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील भाजीबाजार असो की मुख्य रस्त्यांच्या बाजुला काही लोकांनी थाटलेले छोटेसे उपहागृह असो. उपहारगृह चालकांना परवाना घेताना ज्या नियम व अटींचे पालन करण्यास सांगण्यात आले होते त्या नियमांचे देखील पालन करणे आवश्यक आहे मात्र या व्यावसायीकांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केले जात असल्याचे चित्र दिसून येते.
शहरात बहुतेक ठिकाणी घाणीच्या साम्राज्यात काही उपहार गृह व टपऱ्यावरील दुकानादार पदार्थ विकत असल्याचे दिसून येते. या व्यावसायीकांनी स्वच्छतेच्या बाबींकडे पूर्णत; दुर्लक्ष केले असल्याने या पदार्थांचे सेवन करणारे नागरिक मात्र विविध आजाराला बळी पडत आहे. सर्व उपहारगृह व हॉटेलात नियमांचे उल्लघंन केले जात असताना संबंधीत विभागाने मात्र अद्यापही कुठल्याही उपहारगृह चालकावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
पावसळ््यात तर डास व माश्यांचा प्रकोप वाढतो. डास व माश्या आजारांचे वाहक असून पावसाळ्यात खानपानाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. स्वच्छता न पाळल्यास खानपानातून विविध आजार बळावतात. मात्र हॉटेल वाल्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नसते. त्यांना फक्त तयार केलेले खाद्य पदार्थ विकायचे असल्याने ते या भानगडीत पडत नाही. मात्र नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. याकडे अन्न व औषध विभाग तसेच नगर परिषदेच्या अधिकाऱ्याचे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)