शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वाहन अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:07 IST

शहरातील राज्य मार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालक

तीन गंभीर : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : शहरातील राज्य मार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर पडलेले खड्डे वाहन चालक व पायी मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी मृत्यूला आमंत्रण देत आहेत. आमगाव शहरातील याच राज्य मार्गावर बुधवारच्या पहाटे किरणापूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले. आमगाव शहरातील मुख्य राज्य मार्गावर नियोजन अभावी रस्ते खड्यांमध्ये रुपांतरीत झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील मार्गक्रम धोक्याचे ठरले आहे. १८ जुलैला मध्यरात्री किरणापूर येथील कावरे कुटुंबिय रायपूरकडे टाटा इनोव्हा क्र.सीजी ०४ डीए ०३०९ या वाहनाने रायपूरकडे जाताना आमगाव व येथील मानकर गुरुजी चौकात खड्यांमधून वाहन मार्गक्रम करताना वाहन असंतुलीत झाले. परिणामी हे वाहन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या रस्ता दुभाजकाला धडकले. यात वाहनाचे समोरील भागाचा चंदामेंदा झाला. या अपघातात वाहनातील भोजराज नुतनलाल कावरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील कृष्णा शोभेलाल कावरे (१९), आशिष शोभेलाल कावरे (२०), वासूदेव शोभेलाल कावरे (१७) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पोलीस विभागाने अपघातातील वाहन चालक संजू राजकुमार शाहू (४०) रा. रायपूर (छ.ग.) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव येथील मुख्य मार्गावर पडलेल्या रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताची होत असलेली घटना यात सार्वजनिक बांधकाम विभागाला घटनेच्या दोषारोपात घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.