अरे देवा! कोरोनामुळे झाला बहिण भावाच्या नात्यात दुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:56+5:30

भारतीय संस्कृतीतील ही काही क्षणांची ऐतिहासिक परंपरा बालपणापासूनच एक भाऊ आणि प्रिय बहिण यांना एका निरागस बंधनांमध्ये घट्ट बांधून ठेवते.आणि त्यांचे हे नाते अतूट आणि परमपवित्र मानले जाते.परंतु यंदा सर्व जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाच्या रूपाने बहिण भावाच्या अतूट नात्यात दुरावा निर्माण केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

Oh god Corona caused a rift in the sister-brother relationship | अरे देवा! कोरोनामुळे झाला बहिण भावाच्या नात्यात दुरावा

अरे देवा! कोरोनामुळे झाला बहिण भावाच्या नात्यात दुरावा

Next
ठळक मुद्देरक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट : ऑनलाईन होणार भावा-बहिणींची भेट

संजयकुमार बंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : श्रावणी पौर्णिमा अर्थात बहिण भावाच्या नात्यातील एक अतूट बंधन म्हणजे रक्षाबंधन! या दिवशी प्रत्येक बहिणीच्या मनात आपल्या प्रिय भावाबद्दल शुभकामना व शुभ भावना यांचा जणू सागरच उसळत असतो. भारतीय संस्कृतीतील ही काही क्षणांची ऐतिहासिक परंपरा बालपणापासूनच एक भाऊ आणि प्रिय बहिण यांना एका निरागस बंधनांमध्ये घट्ट बांधून ठेवते.आणि त्यांचे हे नाते अतूट आणि परमपवित्र मानले जाते.परंतु यंदा सर्व जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाच्या रूपाने बहिण भावाच्या अतूट नात्यात दुरावा निर्माण केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
रक्षाबंधन या सणाची भाऊ आणि बहिण आतुरतेने वाट बघत असतात. लग्न झालेली दूरवर राहणारी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचा हा रेशमी धागा बांधण्यासाठी माहेरी जाते व राखी बांधून आपले भगिनी प्रेमाचे कर्तव्य निभावते मात्र कोरोनाच्या परिस्थितीने सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. गावी जायचे म्हटले तर बसेस, रेल्वे सर्व सुविधा बंद आहे. लॉकडाऊन असल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला फार मोठे प्रवास नियमाचे सोपस्कार पार पाडावे लागतात. शिवाय कोरोनाच्या संसर्गाने राखी पोहोचती करण्यासाठी असणारे पोस्ट आॅफिस सेवा, कुरिअर सेवा सुरू आहेत.
अथवा संसर्गामुळे कुरिअर घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे राखी पाठवावी कशी बिकट प्रश्न बहिणीसमोर निर्माण झाला आहे. याचा परिणाम राखी विक्र ेत्यांवर झाला आहे. भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यानंतर तिला मिळणाºया रिटर्न गिफ्ट पासूनही वंचित राहावे लागणार आहे.
बहिण जी पवित्र राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते त्या रंगीत रेशमी धाग्यामध्ये बहिणीचा आपल्या भावाला एक अबोल निरोप असतो की, दादा आज तुझी ही बहिण या आशेने राखी बांधत आहे की, भविष्यात जेव्हा मला तुझी गरज भासेल तेव्हा याच दणकट हातांनी तु मला मदत करशील. माझे रक्षण करण्यास समर्थ असशील.
हा रेशमी धागा मना मनांना एकत्र घट्ट बांधून ठेवणार आहे. रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी बहिणीला व्हाट्सअप, ऑनलाईन किंवा व्हिडिओकॉलद्वारेच भावाचे दर्शन घेऊन संवाद साधता येणार आहे.
कोरोनामुळे म्हणावेसे वाटते, अरे देवा! कोरोनामुळे झाला बहिण भावाच्या नात्यात दुरावा!

Web Title: Oh god Corona caused a rift in the sister-brother relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.