शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

न.प.ने फुंकला कर वसुलीचा शंख

By admin | Updated: February 2, 2016 01:39 IST

९ कोटी ६५ लाख रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेच्या कर वसुली विभागाने सोमवारपासून (दि.१) वसुली मोहिमेचा शंख फुंकला.

पहिल्या दिवशी तीन लाख : बाजार भागात छेडली मोहीमगोंदिया : ९ कोटी ६५ लाख रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेच्या कर वसुली विभागाने सोमवारपासून (दि.१) वसुली मोहिमेचा शंख फुंकला. मोहिमेच्या पहिल्या दिवशी कर वसुली विभागाच्या पथकाने बाजार परिसरात मोहीम छेडून थकबाकीदारांकडे दस्तक दिली. पहिल्याच दिवशी पथकाने रोख व धनादेश अशी सुमारे तीन लाख रूपयांची कर वसुली केली आहे. कर वसुली पथकाने पहिल्याच दिवशी बाजार परिसरात मोहीम झेडली. यात पथकाने दोन लाख २४ हजार रूपये रोख तर ५५ हजार रूपयांचे धनादेश मिळविले आहेत. पुढे आणखी जोमाने काम करण्याची तयारी पथकाने दर्शविली.जुनी थकबाकी व चालू वर्षातील अशा प्रकारे सुमारे नऊ कोटी ६५ लाख रूपयांची कर वसुली नगर परिषदेला करायची आहे. कर वसुलीची विशेषता अशी की यात सामान्य नागरिकांकडे कमी व धनाढ्यांकडे जास्त थकबाकी आहे. कर वसुलीच्या या कामात राजकीय अडसर येत असल्याने कराची थकबाकी वाढतच गेली आहे. मात्र मागील वर्षापासून कठोरतेने कर वसुली विभागाने मोहीम छेडल्याने त्याचे फलीतही मिळाले होते. मागील वर्षी ५० टक्केच्या वर कर वसुली झाल्याची नगर परिषदेतील ही पहिलीच कामगिरी होती. यावर्षी किती लक्ष्यपूर्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता हे वर्ष आर्थिक वर्ष संपन्यासाठी दोन महिने उरले असून त्यात नऊ कोटी ६५ लाखांचा आकडा गाठायचा असल्याने कर वसुली विभाग सोमवारपासून (दि.१) पुन्हा कामाला लागला आहे. कर वसुलीसाठी पथकाने बाजार परिसरातील थकबाकीदारांकडे धडक दिली. परिणामी कर वसुली पथकाने पहिल्याच दिवशी चांगली मोठी रक्कम वसुल करून आणल्याची माहिती आहे. आता पुढे आणखी जोमात कर वसुलीची मोहीम छेडली जाणार असून मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कुणाची गय केली जाणार नसून कठोरतेने वसुली केली जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)वसुली पथकाचे गठन कर वसुलीचे काम अत्यंत किचकट व तेवढेच धोक्याचे असल्याने नगर परिषदेने यंदाही कर वसुलीसाठी पथकाचे गठन केले आहे. या पथकामध्ये नगर परिषदेच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पथकाच्या एकत्रीत कारवाईने मागील वर्षी नगर परिषदेला चांगले रिजल्ट मिळाले होते हे विशेष.