शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण झाले चारपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी (दि.२०) ५१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर ९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. रुग्ण संख्येत घट होत असून मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली असून मात बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने पॉझिटिव्हीटी रेट ३.९३ टक्क्यांवर आला आहे.

ठळक मुद्दे५१० रुग्णांची मात : ९८ रुग्णांची नोंद : चार बाधितांचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून झपाट्याने ओसरु लागली आहे. मागील आठवडाभरापासून रुग्ण संख्येत सातत्याने घट होेत असून बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या चार पट असल्याने आता कोरोना संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. संसर्ग आटोक्यात आहे म्हणून याकडे कानाडोळा करुन चालणार नाही तर पूर्वी इतकी काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि.२०) ५१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर ९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. रुग्ण संख्येत घट होत असून मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली असून मात बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने पॉझिटिव्हीटी रेट ३.९३ टक्क्यांवर आला आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चित दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १४९४२३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२३८८३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन करण्यात येत आहे. यातंर्गत १४८९२२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२८२४३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९८९३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३७३८६ जणांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १८५२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १२०४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

२ लाख १६ हजार नागरिकांचे लसीकरण - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून काेरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. यातंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १६ हजार २५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. २४९२ जणांची चाचणी ९८ पॉझिटिव्ह- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत आहे. बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे चाचण्यांवरुन सुध्दा दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने एकूण १७६६ आरटीपीसीआर आणि ७२६ रॅपिड अँटिजन अशा एकूण २४९२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९८ जण पॉझिटिव्ह आले. गुरुवारचा पॉझिटिव्हीटी रेट ३.९३ टक्के होता. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या