आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आणखी नऊ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:21+5:30

शहराच्या बापुजी की कुटिया बिअर बारमध्ये एकजण विनाकारण फिरताना आढळले. त्याच्यावर पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कामधेनू होंडा शोरूमच्यासमोर विनाकारण फिरत असताना आढळल्यामुळे पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Nine more crimes were filed under disaster management | आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आणखी नऊ गुन्हे दाखल

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आणखी नऊ गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देसंचारबंदी आदेशाचेही उल्लंघन । खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवरही गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून संचारबंदी लागू करण्यात आली.जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. खर्रा, तंबाखू, गुटख्याची दुकाने बंद करण्याचे आदेश लॉकडाऊनपूर्वीच देण्यात आले.परंतु आजही खर्रा विकला जात आहे. भाजीपाला विक्रेते किंवा किराणा दुकानदार लॉकडाऊनचे पालन न करता दुकानात गर्दी करतात. काही लोक खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतात तर काही विनाकारण रस्त्यावर फिरतात अश्या नऊ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.
बालाघाट रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाºया रिंगरोडवरील पुलावर विनाकारण फिरणाऱ्याचौघांवर पोलीस नायक अशोक अंबरवाडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहराच्या बापुजी की कुटिया बिअर बारमध्ये एकजण विनाकारण फिरताना आढळले. त्याच्यावर पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कामधेनू होंडा शोरूमच्यासमोर विनाकारण फिरत असताना आढळल्यामुळे पोलीस शिपाई पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली. गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया फुलचूरच्या रिलायन्स पेट्रोल पंपजवळ एकाने ३ एप्रिलच्या सायंकाळी ६.४५ वाजता खर्रा खाऊन थुकंल्याने पोलीस शिपाई अशोक अंबरवाडे यांनी त्याला पकडून त्याच्याविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच फुलचूरच्या बसस्थानकाजवळ एकाने ३ एप्रिलच्या सकाळी ७.३५ वाजता दरम्यान एकाने खर्रा खाऊन थुंकल्यामुळे त्याच्यावरही भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
३ एप्रिलच्या सकाळी ७.४० वाजता रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पुन्हा एकाने खर्रा खाऊन थुंकल्याने त्याच्या विरूध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nine more crimes were filed under disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.