शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

इसमाकडून जप्त केली नऊ लाखांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST

गोंदिया : संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या इसमाला रेल्वे पोलिसांनी पकडले असता त्याच्या बॅगमधून तब्बल आठ लाख ९० हजार ७५० रुपयांची ...

गोंदिया : संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या इसमाला रेल्वे पोलिसांनी पकडले असता त्याच्या बॅगमधून तब्बल आठ लाख ९० हजार ७५० रुपयांची रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात मंगळवारी (दि.१५) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस सहायक निरीक्षक संदीप गोंडाणे, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, हवालदार मनोज गुप्ता, चंद्रकांत भोयर, कुणाल गिरनतवार हे रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक-१ येथे गस्तीवर असताना त्यांना मुख्य प्रवेशद्वार परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या खांद्यावर काळी बॅग घेऊन वावरताना दिसला. एवढेच नव्हे तर पोलिसांना बघून तो नजर चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. विचारपूस केली असता त्यांना आपले नाव राजकुमार प्रभूलाल देवांगण (रा.शंकरपूर, राजनांदगाव) असे सांगितले. त्याच्या बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये रोख आठ लाख ९० हजार ७५० रुपये मिळून आले. मात्र, त्याने या रकमेबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, प्रकाराबाबत आयकर विभागाला माहिती दिली आहे. प्रकरणी पुढील कार्यवाही आयकर विभाग करीत आहे.