शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकांचे नव्याने विद्युतीकरण

By admin | Updated: April 13, 2017 02:02 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या विद्युत विभागाद्वारे रेल्वे स्थानकांचे विद्युतीकरण व पॅसेंजर

दोन नवीन वॉटर कुलर : एस्कलेटरचे काम प्रगतीपथावर गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या विद्युत विभागाद्वारे रेल्वे स्थानकांचे विद्युतीकरण व पॅसेंजर हॉल्टला पूर्णत: विद्युतीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच गोंदिया-चंद्रपूर लोहमार्गावरही विद्युतीकरणाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाला सन २०१६-१७ मध्ये ५० स्थानकांमध्ये १०० टक्के एलईडी फिटिंग करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. विद्युत विभागाद्वारे आतापर्यंत ६० स्थानकांमध्ये निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक एलईडी फिटिंगची व्यवस्था करण्यात आली. तसेच नागपूर मंडळाच्या राजनांदगाव स्थानकात लिफ्टची स्थापना करून ती सुरू करण्यात आली आहे. गोंदिया स्थानकात लिफ्ट उभारण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. लवकरच ही लिफ्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. याशिवाय गोंदिया व राजनांदगाव स्थानकांवर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम प्रगतीपथावर आहे. सन २०१६-१७ मध्ये नागपूर मंडळाच्या चिचोली बुजुर्ग, अरूणनगर व मंडेला पॅसेंजर हॉल्टचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना सुविधा मिळू शकेल. आवश्यक सुविधेअंतर्गत गोंदियात दोन नवीन वॉटर कुलर लावण्यात आले आहेत. वडसा, इतवारी, नागभीड, सालेकसा व डोंगरगड स्थानकांमध्ये सध्याचे वॉटर कुलर बदलवून नवीन वॉटर कुलर लावण्यात आले आहेत. मंडळातील ३२ स्थानकांच्या प्रसाधनांमध्ये आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळातील ए, बी, डी, व ई श्रेणीच्या स्थानकांमध्ये एकूण ३३ विद्युतीय आधुनिक नामफलकांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)