‘त्या’ १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी गोंदिया येथे आढळला होता. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण ...

Negative reports of 'that' 12 persons | ‘त्या’ १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

‘त्या’ १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देबाधित युवकाच्या कुटुंबीयांचा सुध्दा समावेश । जिल्हावासीयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी गोंदिया येथे आढळला होता. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने सुध्दा शुक्रवारीच कोरोनाची लागण झालेल्या युवकासह त्याच्या कुटुंबीयांना सुध्दा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्वारेंटाईन केले होते. त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह एकूण १४ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून १२ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून दोन जणांचा रिपोर्ट रविवारी प्राप्त होणार आहे.
देशासह राज्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्रावरील संकटात वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनकडून युध्द स्तरावर प्रयत्न केले जात आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाचे संकट टाळण्यासाठीच सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन केले आहे. मात्र यानंतरही काही जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यातच शुक्रवारी गोंदिया येथील गणेशनगर परिसरातील एका २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रयोगशाळेच्या रिपोर्टनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा व शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली होती.यानंतर जिल्हा आणि आरोग्य प्रशासन सुध्दा अ‍ॅक्शन मोडवर आले.
आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधीत युवकासह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना सुध्दा शुक्रवारी सकाळीच येथील शासकीय महाविद्यालयात क्वारेंटाईन केले. बाधित युवक १७ मार्चला बँकांकहून गोंदिया येथे आला होता. या कालावधीत त्याचा बऱ्याच जणांशी संपर्क आला. त्यामुळे तो नेमका कुणा कुणाच्या संपर्कात आला याची चौकशी आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शुक्रवारी केली. तसेच त्याच्या सर्वाधिक संपर्कात आलेल्या त्याच्या चार मित्रांना सुध्दा क्वारेंटाईन केले आहे. तर संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना सुध्दा क्वारेंटाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
बाधीत युवकाच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे नमुणे शुक्रवारी नागपूर येथील मेयोच्या प्रयोशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे शनिवारी प्राप्त झालेल्या रिपोर्टनंतर स्पष्ट झाले. तर इतर सात जणांचे रिपोर्ट सुध्दा निगेटीव्ह आल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Negative reports of 'that' 12 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.