शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका लागली नाली सफाईच्या कामाला

By admin | Updated: June 14, 2014 23:42 IST

पाऊस कधीही हजेरी लावणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळेच नगर परिषदेने शहरात सफाई अभियान जोमाने राबविण्यास सुरूवात केली आहे. शहरातील नाल्यांची सफाई केली जात असून त्यातील कचरा

गोंदिया : पाऊस कधीही हजेरी लावणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळेच नगर परिषदेने शहरात सफाई अभियान जोमाने राबविण्यास सुरूवात केली आहे. शहरातील नाल्यांची सफाई केली जात असून त्यातील कचरा व गाळ काढला जात असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी मोहिमेंतर्गत शहरातील श्रीजी लॉंस लगतचा नाला जेसीबीच्या माध्यमातून साफ करण्यात आला. यातून मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ काढून नाल्याची सफाई करण्यात आली.
७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. त्यानंतर अद्याप पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र कधीही पाऊस हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाल्याने नगर परिषदेने शहराच्या आतील भागात असलेल्या नाल्यांच्या सफाईची स्वच्छता मोहीम हाती घेतली. शुक्रवारपासून पालिकेच्या स्वच्छता विभागाने ही मोहीम सुरू केली असून यात आंबेडकर चौक ते नेहरू चौक फुटपाथवरील अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्यात आली. तर शनिवारी श्रीजी लॉंसलगतच्या नाल्याची सफाई करण्यात आली. जेसीबी मशीनच्या माध्यमातून या नाल्याची सफाई करण्यात आली असून यातून मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ काढण्यात आला.
विशेष म्हणजे पालिकेने यापूर्वीच शहरातील मोठ्या नाल्यांची जेसीबीच्या माध्यमातून सफाई मोहीम राबविण्यात आली आहे. शहरातील नाल्यांमधून पाण्याची निकासी व्यवस्थित होत असल्याने पावसाने पाणी अडून राहणार नाही व शहरवासीयांच्या घरात शिरणार नाही. यासाठीच ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या सफाई अभियानांतर्गत मात्र नाल्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक आढळून आल्याचे दिसून आले. हाच कचरा नाल्यांमध्ये अडकून नाल्यांमधून पाण्याची निकासी होत नसल्याने सांडपाणी शहरवासीयांच्या घरात शिरण्याचा धोका असतो.
शुक्रवारी बरसलेल्या पावसाने पालिकेला हा धोका निर्माण होऊ शकणार असल्याचे संकेत दिलेच आहेत. आता नाल्यांची सफाई केल्याने कितपत धोक टळू शकतो हे बघायचे आहे. (शहर प्रतिनिधी)