शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर शिक्षकाचे स्थानांतर करा

By admin | Updated: February 6, 2016 01:57 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी येथे कार्यरत पदविधर...

केंद्रीय शाळा अर्जुनी : विद्यार्थी, पालक व नागरिकांची मागणी इंदोरा बु. : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी येथे कार्यरत पदविधर शिक्षक सी.डब्ल्यू. खोब्रागडे यांचे त्वरित स्थानांतर करण्याची मागणी पालकांसह विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी येथे मागील ११ वर्षांपासून पदविधर शिक्षक सी.डब्ल्यू. खोब्रागडे कार्यरत आहेत. सदर शिक्षकाच्या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी पं.स. तिरोडा तसेच गटशिक्षणाधिकारी तिरोडा यांना केल्या. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सदर शिक्षक पदविधर असूनसुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा कुठलाच फायदा नाही. विद्यार्थ्यांना सदर शिक्षक शिकवतच नाही. विशेष म्हणजे वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे महत्वाचे विषय या शिक्षकाकडे असल्यामुळे विद्यार्थ्यांचा फार मोठा नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात जि.प. सदस्य कैलास पटले यांना पालकांनी तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या अनुसंगाने या शिक्षकाचे स्थानांतर करुन त्यांच्या जागी दुसरा शिक्षक देण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. जि.प. सदस्य कैलास पटले यांनी पालकांच्या व ग्रामपंचायतच्या तक्रारीवरुन पदविधर शिक्षक खोब्रागडे यांचे स्थानांतर करण्यासाठी जि.प.च्या सभेत शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली व सदर शिक्षकांचे स्थानांतर करुन नवीन पदवीधर शिक्षक देण्याची विनंती केली.सदर शिक्षकाला आठ दिवसात स्थानांतर केले नाही तर पालकांचे व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह शाळा व्यवस्थापन समिती यांना उपोसनाचा मार्ग अवलंब वावा लागेल, असे तक्रारीतून सांगण्यात आले आहे.