पदवीधर शिक्षकाचे स्थानांतर करा

By Admin | Updated: February 6, 2016 01:57 IST2016-02-06T01:57:01+5:302016-02-06T01:57:01+5:30

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी येथे कार्यरत पदविधर...

Move graduate teacher | पदवीधर शिक्षकाचे स्थानांतर करा

पदवीधर शिक्षकाचे स्थानांतर करा

केंद्रीय शाळा अर्जुनी : विद्यार्थी, पालक व नागरिकांची मागणी
इंदोरा बु. : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी येथे कार्यरत पदविधर शिक्षक सी.डब्ल्यू. खोब्रागडे यांचे त्वरित स्थानांतर करण्याची मागणी पालकांसह विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी येथे मागील ११ वर्षांपासून पदविधर शिक्षक सी.डब्ल्यू. खोब्रागडे कार्यरत आहेत. सदर शिक्षकाच्या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी पं.स. तिरोडा तसेच गटशिक्षणाधिकारी तिरोडा यांना केल्या. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सदर शिक्षक पदविधर असूनसुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा कुठलाच फायदा नाही. विद्यार्थ्यांना सदर शिक्षक शिकवतच नाही. विशेष म्हणजे वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे महत्वाचे विषय या शिक्षकाकडे असल्यामुळे विद्यार्थ्यांचा फार मोठा नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात जि.प. सदस्य कैलास पटले यांना पालकांनी तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या अनुसंगाने या शिक्षकाचे स्थानांतर करुन त्यांच्या जागी दुसरा शिक्षक देण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. जि.प. सदस्य कैलास पटले यांनी पालकांच्या व ग्रामपंचायतच्या तक्रारीवरुन पदविधर शिक्षक खोब्रागडे यांचे स्थानांतर करण्यासाठी जि.प.च्या सभेत शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली व सदर शिक्षकांचे स्थानांतर करुन नवीन पदवीधर शिक्षक देण्याची विनंती केली.
सदर शिक्षकाला आठ दिवसात स्थानांतर केले नाही तर पालकांचे व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह शाळा व्यवस्थापन समिती यांना उपोसनाचा मार्ग अवलंब वावा लागेल, असे तक्रारीतून सांगण्यात आले आहे.

Web Title: Move graduate teacher