शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन इंद्रधनुष’ माघारले

By admin | Updated: February 6, 2016 01:46 IST

बालक व माता मृत्यूला आळा बसावा यासाठी राज्यात मिशन इंद्रधनुष सुरू करण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यात हे मिशन अपेक्षित परिणाम साधू शकले नाही.

लसीकरणात उदासीनता : ५७.४८ टक्के गर्भवतींचे लसीकरणनरेश रहिले गोंदियाबालक व माता मृत्यूला आळा बसावा यासाठी राज्यात मिशन इंद्रधनुष सुरू करण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यात हे मिशन अपेक्षित परिणाम साधू शकले नाही. मिशनअंतर्गत टिटॅनस, हिपेटायटिस, गोवर याचे लसीकरण ५७ ते ७२ टक्के झाले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रसुती व बालआरोग्य अभियानांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१५-१६ या वर्षात जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रसूतीपूर्वी २५ हजार ५८० महिलांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. परंतु १६ हजार ८७५, म्हणजेच ६५.९७ टक्के नोंदणी झालेली आहे. प्रसूतीपूर्वी नोंदणीचे १२ आठवड्याचे उद्दीष्ट २३ हजार २२ ठेवण्यात आले होते. मात्र ही नोंदणी १४ हजार २७५, म्हणजेच ६२.०१ टक्के झाली आहे. २५ हजार ५८० गर्भवती महिलांचा टिटॅनसची लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. परंतु १४ हजार ७०४ महिलांना ही लस देऊन झाली असून ५७.४८ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.चार टप्यात होते मिशन इंद्रधनुषजिल्ह्यात मिशन इंद्रधनुषअंतर्गत ७ ते १३ आॅक्टोबर हा पहिला टप्पा, १६ ते २२ नोव्हेंबरदरम्यान दुसरा टप्पा, १६ ते २२ डिसेंबर तृतीय टप्पा, तर २५ ते ३१ जानेवारीदरम्यान चौथा टप्पा अश्या चार टप्प्यात लस देण्यात आली. या मिशनअंतर्गत टीटी-१, टीटी-२, ओपीवी (इनएक्टीवेटेड पोलियो वॅक्सिन), हिपेटायटिस १, २, ३, गोवर १, २ व विटामिन ए १, २ चा डोज बालक व गर्भवती महिलांना द्यायचे होते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जाऊन नोंदणी करून १०० टक्के लस द्यायची होती. पण हे उद्दीष्ट गाठणे शक्य झाले नाही.या मिशनमध्ये जिल्ह्यातील आशा कार्यकर्ता, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. एकही बालक व गर्भवती माता लसपासून वंचित राहू नये असे निर्देश शासनाने दिले होते.- हिपेटायटीसचे उद्दिष्टही अपूर्णजिल्ह्यात २३ हजार २५५ बालकांना हिपेटायटीस ३, बी.सी.जी., पोलियो डोज, गोवर, गोवर बुस्टरच्या लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यात १४ हजार ३८२ बालकांना (६१.८४ टक्के) हिपेटायटीस ३, तर १४ हजार ४१२ (६१.९७ टक्के) बालकांना पोलिओचा तिसरा डोज देण्यात आला. १४ हजार ७१७ (६३.२९ टक्के) बालकांना बी.सी.जी., १५ हजार १३५ (६५.०८ टक्के) बालकांना गोवर व १४ हजार २६३ (६१.३३ टक्के) बालकांना गोवर बुस्टरची लस देण्यात आली. पोलियोचा कोणताही डोज ६३ टक्केपेक्षा अधिक बालकांना देण्यात आलेला नाही. जीवनसत्वाच्या सर्व मात्रा ७५.८९ ते ९१.३४ टक्केदरम्यान देण्यात आल्या. टिटॅनसची लस १० वर्षाखालील २४ हजार ६१३ बालकांना देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यातील १७ हजार २६८ बालकांना ही लस देण्यात आली असून ७०.१६ टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले होते. टिटॅनस लस १६ वर्षाखालील २५ हजार ४३७ बालकांना द्यायची होती. त्यातील १८ हजार ३५८ म्हणजे ७२.१७ टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे.