नोकरीच्या नावावर लाखोंनी गंडविले

By Admin | Updated: February 9, 2016 01:28 IST2016-02-09T01:28:43+5:302016-02-09T01:28:43+5:30

नोकरीच्या नावावर बेरोजगार तरूणांना लाखो रुपयांनी लुटणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Millions of people have misbehaved in the name of their job | नोकरीच्या नावावर लाखोंनी गंडविले

नोकरीच्या नावावर लाखोंनी गंडविले

तिघांवर गुन्हा : आणखी तक्रारकर्ते पुढे येण्याची शक्यता
गोंदिया : नोकरीच्या नावावर बेरोजगार तरूणांना लाखो रुपयांनी लुटणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींनी अनेकांना नोकरीच्या नावावर गंडविल्याने आणखी काही तक्रारकर्ते पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ आॅगस्ट २०१५ ते ३ आॅक्टोबर २०१५ या दरम्यान वन्यप्राणी व पर्यावरण संरक्षण संस्था गोंदिया या संस्थेच्या माध्यमातून वनविभागात शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या नावावर गोरेगाव तालुक्याच्या जानाटोला येथील महेश गोवर्धन बिसेन (३२) यांच्याकडून ३ हजार व इतर काही लोकांकडून असे १० लाख ५० हजार रूपये घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तूर्त या प्रकरणी आरोपी निशांत खुशाल कांबळे (३६), ज्योत्स्ना निशांत कांबळे (३०) व रेखा खुशाल कांबळे (६५) सर्व रा.लक्ष्मीनगर अर्जुनी-मोरगाव यांच्यावर भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महेश बिसेन यांनी तक्रार दाखल केली असली तरी अशा पद्धतीने फसवणूक झालेले अनेक पीडित समोर येत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Millions of people have misbehaved in the name of their job