शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

५०० रूग्णांवर औषधोपचार

By admin | Updated: October 14, 2015 02:31 IST

माहुरकुडा प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल यांच्या सहकार्याने मोरगाव येथील रोगनिदान शिबिराचा लाभ

अर्जुनी-मोरगाव : माहुरकुडा प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल यांच्या सहकार्याने मोरगाव येथील रोगनिदान शिबिराचा लाभ परिसरातील ५०० च्यावर लोकांनी घेतला. ब्रह्मपुरी येथील विविध रोगांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून आरोग्य तपासणी करुन मोफत औषध वितरित करण्यात आली. तसेच काहींना संदर्भ सेवेचा सल्ला देण्यात आला. गोंदिया जिल्हा परिषदेचे माहुरकुडा क्षेत्राचे जि.प. सदस्य गिरिश पालिवाल तसेच ग्रामपंचायत मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोरगावच्या जि.प. शाळेत रोगनिदान शिबिर रविवार (दि.११) करण्यात आले. उद्घाटन जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांच्या हस्ते सरपंच भूमिता लोधी, पं.स. सदस्य नाना मेश्राम, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत परशुरामकर, उपसरपंच राजू पालीवाल, मुख्याध्यापक सुखदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा परिषद प्रभागातील सर्वसामान्य जनतेला लागण झालेल्या रोगांची माहिती व्हावी, रोगावर सल्ला व उपचार होण्याच्या हेतूने जि.प. सदस्य गिरिश पालिवाल यांनी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.एस.के. नारिंगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अंजली नारिगे, सर्जन डॉ. सौरभ कुंभारे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. कुणाल फटिंग, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. नितीन कोळवते, बालरोग तज्ज्ञ डॉ.पी.एस. राव, जनरल फिजिशियन डॉ. एन.ए. चव्हाण उपस्थित होते. त्यांच्याकडून माहुरकुडा, मोरगाव, मालकनपुर, तावशी, कवठा, खैरी, सिरोली या ठिकाणाहून आलेल्या ५०० महिला, पुरूष, बालक यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. काहींना पुढील तपासणी करण्यासाठी ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी येथे येण्याचा सल्ला देण्यात आला. आरोग्य तपासणी करणाऱ्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. शिबिरासाठी ख्रिस्तानंद रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ता हरिश्चंद्र तलमले, श्रीनिवास, पायल धुर्वे, सारिका बुंदे, रिता खोब्रागडे, सीमा कुत्तरमारे यांनी सहकार्य केले. नव्यानेच निवडून आलेले जि.प. सदस्य गिरिश पालिवाल यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परिसरातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)