अहवाल येईपर्यंत बाजारपेठ राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:20+5:30

शहर बफर झोनमध्ये असल्याने बाजारपेठ बंद झाल्यापासून नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता अडचण येत असल्यामुळे भाजीपाला दुकान सुरु होणार व पुढील २ दिवसांत चार ठिकाणी विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन न करता औद्योगीक प्रशिक्षण केंद्रात शहर व ग्रामीण भागातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची एकत्रीत सोय करण्यात येईल.

The market will remain closed until the report is received | अहवाल येईपर्यंत बाजारपेठ राहणार बंद

अहवाल येईपर्यंत बाजारपेठ राहणार बंद

Next
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना : तालुका प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शहरात १ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहर बफर झोन घोषित केल्यामुळे औषधी दुकाने व दवाखाने व्यतिरिक्त संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील २३ नागरिकांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातील २ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहे. उर्वरीत नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी दिली.
तालुक्यातील स्थिती बघता आमदार विजय रहांगडाले यांनी सभा बोलाविली. सभेला प्रामुख्याने नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, मुख्याधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, तालुका आरोग्य उपधीक्षक डॉ. चंद्रकिशोर पारधी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल मोहने, पोलीस उपनिरीक्षक राधा लुटे तसेच नगर परिषद व आरोग्य विभागाचे कार्चारी उपस्थित होते. शहर बफर झोनमध्ये असल्याने बाजारपेठ बंद झाल्यापासून नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता अडचण येत असल्यामुळे भाजीपाला दुकान सुरु होणार व पुढील २ दिवसांत चार ठिकाणी विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन न करता औद्योगीक प्रशिक्षण केंद्रात शहर व ग्रामीण भागातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची एकत्रीत सोय करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा क्वारंटाईन केदं्रात अनधिकृत व्यक्ती अथवा नातेवाईकांनी प्रवेश केल्यास पाच हजार रूपये दंड आकारून गुन्हा दाखल करावा असे आदेश उपविभागीय अधिकारी तळपाडे यांनी दिले.
शहरात मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावून जिल्हा सीमेवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलीस विभागाने न.प.प्रशासनास द्यावी, क्वारंटाईन केंद्रात जेवणाची गुणवत्ता वाढविण्यात यावी अशा सूचना आमदार रहांगडाले यांनी दिल्या.

Web Title: The market will remain closed until the report is received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.