शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धान खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

तपासणी दरम्यान तालुक्यातील विविध गटातील धान खरेदी परवानाधारक व्यापारी व शेतकऱ्यांची भेट घेतली. धान खरेदी करणाऱ्या परवानाधारक व्यापाºयांनी नियमानुसार आपल्या धान खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे अनिवार्य आहे. परंतु आताही बहुतांश व्यापाऱ्यांच्या केंद्रावर साधे वजन काटे वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : प्रत्येक तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे व्यापाऱ्यांना धान खरेदी करिता परवाना दिला जात आहे. ज्यामुळे परवानाधारक व्यापारीच फक्त धान खरेदी करु शकतो.परंतु देवरी तालुक्यात अनेक व्यापाऱ्यांकडून अवैधरित्या धान खरेदी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लोकेश सोनूने यांना मिळताच त्यांनी अवैधरित्या धान खरेदी करणाºया व्यापाऱ्यांवर धाड टाकून कारवाई करण्यास बुधवारपासून सुरूवात केली आहे.तालुक्यातील बोरगाव बाजार, परसोडी, चिल्हाटी, मेहताखेडा, येळमागोंदी, इस्तारी, मिसपीरी, ककोडी, कडीकसा, धमदीटोला, घोनाडी, पालांदूर (जमी), चिचगड या गावासह तालुक्यात इतर ठिकाणी धाड टाकून तपासणीची कारवाई केलीे. यात अवैधरित्या धान खरेदी करणाऱ्याआठ व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम १९६३ कलम ४६ अन्वये कारवाई करुन वजन काटे जप्त केले. तपासणी दरम्यान तालुक्यातील विविध गटातील धान खरेदी परवानाधारक व्यापारी व शेतकऱ्यांची भेट घेतली. धान खरेदी करणाऱ्या परवानाधारक व्यापाºयांनी नियमानुसार आपल्या धान खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे अनिवार्य आहे. परंतु आताही बहुतांश व्यापाऱ्यांच्या केंद्रावर साधे वजन काटे वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी धान खरेदी करणाºया परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपल्या केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवावा अशी सूचना ही या तपासणी दरम्यान सोनूने यांनी दिली. या तपासणी पथकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक मनिष अक्कुलवार, लिपीक रिता शिवणकर, वैशाली साखरे व शिपाई राकेश शहारे यांचा समावेश होता.

टॅग्स :congressकाँग्रेस