शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांच्या वर्चस्वामुळे मराठी शाळा माघारल्या

By admin | Updated: June 18, 2014 00:16 IST

शहरी भागात इंग्रजी शाळांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गोंदिया विभागात अनेक इंग्रजी शाळा सुरू आहेत. पुन्हा नवीन शाळा सुरू होत आहेत. या शाळा सर्रासपणे शासकीय नियमांची

गोंदिया : शहरी भागात इंग्रजी शाळांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गोंदिया विभागात अनेक इंग्रजी शाळा सुरू आहेत. पुन्हा नवीन शाळा सुरू होत आहेत. या शाळा सर्रासपणे शासकीय नियमांची उल्लघंन करुन आपल्या मनाप्रमाणे मासिक/वार्षिक शुल्क आकारणी करीत असल्याचे बोलल्या जाते.
कोणतीही शाळा शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय सुरू करता येत नाही. मात्र काही शाळांना मान्यतासुद्धा नाही. अनेक शाळांमध्ये शैक्षणिक सोर्इंचा अभाव दिसून येतो. शाळेचे पटांगण, खेळाच्या सोई, विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी वर्तमानपत्रे, चर्चासत्रासाठी वेगळी व्यवस्था यांचा अभाव प्रामुख्याने दिसून येतो. विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी भपकेबाज जाहिराती देण्यात येतात. पण प्रत्येक्षात असे दिसून येत नाही.
या शाळांवर राजकीय पुढाऱ्यांचे वरदहस्त असल्यामुळे शिक्षण विभागही कारवाई करण्यात आपली असमर्थता दर्शवीत असतो. शहरी परिसरातील पालक आपल्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून नेहमी जागृत असते. जर चांगल्या प्रतिचे शिक्षण मिळत असेल तर त्यानुसार शुल्क आकारण्यात येते. त्यापेक्षा जास्त खर्च एखाद्या चांगल्या शाळेत करावा लागत असेल तर पालक तयारी दर्शवितातात. याचा फायदा काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेताना दिसून येतात. अशा शाळांकडृून नियमांची अवहेलना केली जाते. शिक्षण विभागाची मान्यता घेतलेल्या किती आणि मान्यता न घेतलेल्या किती शाळा आहेत, ही संशोधनाची बाब आहे. शिक्षण उपसंचालक यांनी निर्धारित केलेल्या शुल्कानुसार आकारणी करावी लागते. पण या शाळा आपण शासनाकडून अनुदान घेत नाही म्हणून आपल्यावर कोणतेच बंधन नाही, अशी सफाई देत असतात. राजकीय वरदहस्ताने या शाळा मिळालेल्या आहेत. या कारणाने त्या आपल्याला मान्यता मिळणे आवश्यक आहे. बहुतेक शाळा सीबीएससी पॅटर्न आणि जाहिरात दाखवितात;पण त्यांनी सीबीएससीची रीतसर मान्यता घेतलेली नसते.
काही शाळांत शैक्षणिक सोर्इंचा अभाव अधिक दिसून येतो. शाळेच्या खोल्या मोठ्या नसतात. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गात बसविले जातात. फर्निचरची व्यवस्था तुटपुंजी असते. खेळाचे मैदान नसते. चर्चासत्रासाठी स्वतंत्र खोली, वृत्तपत्र वाचण्यासाठी वेगळी व्यवस्था, प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव या शाळांमधून दिसून येतो. विद्यार्थी आपल्या शाळेकडे आकृष्ट व्हावेत यासाठी जाहिरातीत अनेक उपक्रम दर्शविले जातात. प्रत्यक्षात जाहिरातीत वरच्या भागावर ‘एसीबीएससी पॅटर्न’ असे लिहिलेले आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाची सोय, प्रशस्त आवार, खेळाचे मैदान, स्वतंत्र वाचनालय अशा अनेक सोई दर्शविण्यात येतात; पण वास्तविक चित्र वेगळेच असते.
सदर शाळांना जिल्हा परिषद व उपसंचालक शिक्षण विभाग यांची मान्यता आवश्यक असते. शिक्षण उपसंचालक कार्यालय मान्यतेविषयी वेळोवेळी कारवाई करते. मात्र अशा शाळांवर होत नसल्याचे दिसून येते. शिक्षण विभागदेखील हतबल असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे ही विद्यालये सामान्य वर्गातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी की श्रीमंत वर्गासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.