चना हुरड्याने दिला अनेकांना रोजगार

By Admin | Updated: December 24, 2015 02:23 IST2015-12-24T02:23:32+5:302015-12-24T02:23:32+5:30

थंडीचा जोर जसजसा वाढत आहे तसतसा शेतातील चना बाजारात येऊ लागला आहे. भाजलेल्या चन्याचा हुरडा खवय्यांना खुणावत आहे.

Many people employed in gram flour | चना हुरड्याने दिला अनेकांना रोजगार

चना हुरड्याने दिला अनेकांना रोजगार

बाराभाटी : थंडीचा जोर जसजसा वाढत आहे तसतसा शेतातील चना बाजारात येऊ लागला आहे. भाजलेल्या चन्याचा हुरडा खवय्यांना खुणावत आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजलेला चना घेऊन बसणाऱ्या लोकांसाठी काही दिवसांकरिता मिळणारा हा रोजगार त्यांना दिलासा देणारा ठरत आहे.
जिभेचे चोचले पुरविण्यासोबतच अनेक नागरिक ओला चना (सोले), तर काही भाजलेले चन्याचे गाठे टाईमपास म्हणून आवडीने खातात. चन्याचा हा हुरडा विक्रीसाठी शहरी भागासोबत गावोगावी उपलब्ध होत आहे. यातून अनेकांना काही दिवसांसाठी का असेना, चार पैसे कमविण्याची संधी मिळत आहे.
खरीप हंगाम संपला की अनेक भागात रोजगाराची समस्या निर्माण होते. त्यामुळे अनेकांना रोजगाराचे नवीन साधन हवे असते. त्यामुळे अनेक नागरिकांसाठी रेल्वे, बसस्थानक, बाजारपेठ आणि इतरत्र हरभऱ्यापासून भाजून मिळणारा हुरडा आज नागरिकांना रोजगार देत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक वर्षापासून एमआयडीसी रिकामी पडलेली आहे. त्यापासून मिळणारा रोजगार मात्र मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजना नशिबावरच अवलंबून आहे. मिळाली तर तिची मजुरी ३-४ महिन्यानंतर मिळते. त्यामुळे नागरिकांना नानाविध कामधंदा करून पोटाची खळगी भरावी लागत आहे. चना-हुरड्यासारखा रोजगार शोधत रेल्वेमधूनही हा व्यवसाय केला जातो. (वार्ताहर)

Web Title: Many people employed in gram flour