माणूस प्रज्ञावंत व शीलवान असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:00 AM2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:29+5:30

शिकल्याशिवाय उपाय नाही. माणसाने प्रज्ञावंत व शीलवंत बनून चारित्र्यसंपन्न जीवन जगून समाजाच्या उद्धारासाठी जागरूक असावे असे प्रतिपादन लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले.

A man is wise and tender in heart | माणूस प्रज्ञावंत व शीलवान असावा

माणूस प्रज्ञावंत व शीलवान असावा

Next
ठळक मुद्देअनिल कानेकर : वैशालीनगरात गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : आंबेडकरी जनतेने नेत्यांच्या मागे न धावता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून शिका, संघटित व्हा व पर्यायाने संघर्षासाठी तयार रहावे. शिकल्याशिवाय उपाय नाही. माणसाने प्रज्ञावंत व शीलवंत बनून चारित्र्यसंपन्न जीवन जगून समाजाच्या उद्धारासाठी जागरूक असावे असे प्रतिपादन लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले.
तालुक्यातील इटखेडा येथील वैशालीनगरात समता बौद्ध समाजाच्यावतीने आयोजित तथागत गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळ््यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक संजय मगर, माजी प्राचार्य उद्धव रंगारी, श्रावण भानारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य आशा झिलपे, उमाकांत ढेंगे, उद्धव मेहेंदळे, अभिमन्यू लोणारे, इंद्रदास झिलपे, चेतन शेंडे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना लोणारे, लक्ष्मण माटे, मूर्तीकार श्रीधर सावरकर, संतोष रोकडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्र माच्या सुरुवातीला गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मॉ जिजाऊ यांच्या छायाचित्रांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. मगर यांनी, आज आपण अत्यंत विपरीत व विसंगत जीवनाकडे प्रवेश करीत आहोत. या देशातील ४-५ टक्के लोकांकडे देशाची ८० टक्के संपत्ती आहे. मानव जातीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले विचार व गौतम बुद्ध यांची अहिंसा अंगीकारून जीवन जगावे असे मत व्यक्त केले. रंंगारी यांनी, आजची तरु ण पिढी व्यसनाकडे वळत आहे. त्यांनी व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे वाढावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या विचारसरणीचा अंगिकार करून पर्यायाने समाजाच्या हितासाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले. आमदार चंद्रिकापुरे यांनी, समाजाने बुद्धाच्या पंचशील तत्वांचे पालन करावे असे सांगीतले.
प्रास्ताविक मनोज लोणारे यांनी मांडले. संचालन मोरेश्वर गोंडाने यांनी केले. आभार दिनेश वासनिक यांनी मानले. कार्यक्रमासाठी समता बौद्ध समाजाचे कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे, अध्यक्ष गुणाजी ढोके, उपाध्यक्ष अनिल मेश्राम, सचिव सिद्धार्थ डोंगरे, सहसचिव उल्हास वासनिक व इतर समाजबांधवांनी सहकार्य केले.

मूर्तीकार व दानदात्यांचा सत्कार
या कार्यक्रमात मूर्तीकार श्रीधर सावरकर यांना बौद्ध समाजाच्यावतीने ‘बुद्ध हिच धम्म’ तर मूर्तीदानदाता कल्पना लोणारे यांना आंबेडकरी चळवळीतील ‘दशा व दिशा’ हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच रात्री भाऊसाहेब कव्वाल यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्र म घेण्यात आला.

Web Title: A man is wise and tender in heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.