शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा येथे कमी खर्चातून तयार केला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा दरवर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यातील गावामध्ये करण्यात येते. तलाव खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण यासारखी कामे केली जातात. सन २०१७ च्या उन्हाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट देऊन त्यांनी एक संकल्पना सुचविली.

ठळक मुद्देसंडे अँकर । अभिमन्यू काळे यांचे मार्गदर्शन, अदानी फाऊंडेशनचा उपक्रम, शेतकऱ्यांना झाली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : बरेच शेतकरी शेतीला सिंचनासाठी नाल्याचा पाण्याचा वापर करतात. यासाठी नाला सरळीकरण आणि खोलीकरणावर शासन सुध्दा लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र याच खर्चातून हेच काम करीत असताना बंधारा तयार करुन पाणी अडवून शेतीसाठी सिंचन केले जाऊ शकते. असाच कमी खर्चातून बंधारा तयार करण्याचा प्रयोग तिरोडा तालुक्यात करण्यात आला.अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा दरवर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यातील गावामध्ये करण्यात येते. तलाव खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण यासारखी कामे केली जातात. सन २०१७ च्या उन्हाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट देऊन त्यांनी एक संकल्पना सुचविली. त्यानुसार नाला खोलीकरण करीत असताना प्रत्येक १०० मिटर अंतरावर ५ ते ६ मिटरचा एक पट्टा तसाच ठेवायचा तो पट्टा नैसर्गिक बांधाचे काम करतो व त्या १०० मिटरच्या पट्यात नाल्याचे पाणी थांबून राहते. तसेच त्या ५ ते ६ मिटरच्या पट्यावरुन नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सुद्धा सोयीचे होते.काळे यांनी सुचविलेली संकल्पना अदानी फाऊंडेशनने प्रत्येक नाला खोलीकरणाच्या कामात अंमलात आणली आणि त्याचे फायदे दिसून येवू लागले. पावसाळ्यात नाले भरुन वाहतात. परंतु हिवाळ्याच्या शेवटी नाले कोरडे पडलेले दिसतात. परंतु सदरच्या संकल्पनेमुळे उन्हाळ्यात सुद्धा नाले तुडुंब भरलेले दिसत आहेत. पाणी वाहून न जाता ते पाणी जमिनीमध्ये झिरपल्याने पाणी पातळीत वाढ झाली तसेच नाल्याद्वारे वाहून जाणाारी माती सुद्धा जमिनीची धूप होणे थांबले. नाल्याच्या परिसरातील शेतकरी पाण्याचा वापर शेतीसाठी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे. नाला खोलीकरण करीत असताना प्रत्येक १०० मिटर, ५ ते ६ मिटरचा पट्टा खोलीकरणाच्या कामानंतर सोडल्यास होणारे फायदे, विलक्षण आहेत. तसेच या संकल्पनेमुळे अतिरिक्त खर्च न करता जलसाठा वाढतो तसेच शेतकºयांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होते.

टॅग्स :Waterपाणी