शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाची शस्त्रे कुलूपबंद

By admin | Updated: February 11, 2015 01:26 IST

उप वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दारूगोळा व शस्त्रांचे प्रशिक्षण देणे सुरू असल्यामुळे त्यांना देय असणारी शस्त्रे पोलीस मुख्यालय कारंजा येथे कुलूपबंद ठेवण्यात आली आहेत.

गोंदिया : उप वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दारूगोळा व शस्त्रांचे प्रशिक्षण देणे सुरू असल्यामुळे त्यांना देय असणारी शस्त्रे पोलीस मुख्यालय कारंजा येथे कुलूपबंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक रेंजमधील दोन ते तीन अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू असून आतापर्यंत जवळपास २० ते २५ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.वन विभागाच्या जुन्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे तर सुरू आहेत. पण नवीन भरती झालेल्यांनाही पूर्व तयारी (रिव्ह्यु) म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. वन विभागात नवीन भरती झालेले अधिकारी-कर्मचारी शस्त्र चालविणे व दारूगोळा सांभाळण्याचे प्रशिक्षण घेवून येतात. त्यांना पूर्वतयारी म्हणून गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण दिले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून कोणताही वन कर्मचारी जंगलात जबाबदारीवर एकटा जाण्यास तयार नाही. वनरक्षकाच्या सोबतीला एकतरी मदतनिस असतोच. मात्र पूर्ण प्रशिक्षीत नसल्यास रायफल किंवा पिस्तूल सोबत घेवून वनात जाणे धोकादायकच व जोखमीचे काम असते. त्यामुळेच सर्वांचे शस्त्र जमा करण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त परिक्षेत्रात विनाप्रशिक्षण व शस्त्रांशिवाय जाणे जोखमीचे असते. एका नक्षल भागात पाच-पाच गावे येतात. त्यामुळे आता वन विभागाने आपल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. एकाच वेळी सर्वांना प्रशिक्षण देणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक रेंजमधून दोन ते तीन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यात आरएफओ, एएफओ व वनपालांचाही समावेश आहे. वन विभागाच्या राऊंड आॅफिसर्स यांना एसएलआर व पिस्तुलांचे तर आरएफओ यांना पिस्तुलांचे प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रशिक्षणासाठी वन विभागातर्फे नागपूरवरून दारूगोळा मागविण्यात आला आहे. मात्र त्याची देखभाल, स्वच्छता, मेंटेनन्स आदी कामांसाठी वन विभागाकडे एक्स्पर्ट नसल्यामुळे शस्त्रे-दारूगोळा पोलीस मुख्यालय कारंजा येथे ठेवण्यात आला आहे. पोलीस विभागात असलेल्या एक्स्पर्टमुळे सदर साहित्य सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)