जिल्हावासीयांना थोडी खुशी थोडा गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:01:05+5:30

जिल्ह्यात १९ मे पासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असूृन हे सर्व मुंबई, पुणे या शहरातून आलेले आहे. गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली होती. तर शुक्रवारी (दि.२९) गोंदिया तालुक्यात पुन्हा तीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली.

A little joy to the people of the district | जिल्हावासीयांना थोडी खुशी थोडा गम

जिल्हावासीयांना थोडी खुशी थोडा गम

Next
ठळक मुद्दे२८ कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त : गोंदिया तालुक्यात वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांपैकी गुरूवार आणि शुक्रवारी (दि.२९) एकूण २८ कोरोना बाधीत रुग्ण कोरानामुक्त झाले. मात्र जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा तीन नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६२ वर पोहचला असला तरी यापैकी २८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी शुक्रवारी थोडी खुशी थोडा गम असेच वातावरण होते.
जिल्ह्यात १९ मे पासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असूृन हे सर्व मुंबई, पुणे या शहरातून आलेले आहे. गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली होती. तर शुक्रवारी (दि.२९) गोंदिया तालुक्यात पुन्हा तीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६२ पोहचला. पण एकूण कोरोना बाधीत रुग्णांपैकी गुरूवारपर्यंत ३ आणि शुक्रवारी २५ असे एकूण २८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकाच दिवशी तब्बल २५ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची ही विदर्भातील पहिलीच घटना असून यामुळे जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ३४ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही बाब निश्चित जिल्हावासीयांना दिलासा देणारी आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तेवढीच चिंता वाढली आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण
गोंदिया क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधील आयसोलेशन कक्षात जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधीत रुग्णांवर मागील आठ ते दहा दिवसांपासून उपचार सुरू आहे. जिल्ह्यात दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण सातत्याने वाढ आहे. मात्र शुक्रवारी येथील तब्बल २५ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे सदैव तणावाखाली असलेल्या सेंटरमधील वातावरण काहीसे आनंदायी होते. डॉक्टर आणि परिचारिकांनी सुध्दा कोरोनामुक्त झालेल्यांचे पुष्षगुच्छ देऊन आणि टाळ्या वाजवून निरोप दिला.
८३१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण ९५० जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ८३१ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ५४ स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप नागपूर येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आणि संस्थामध्ये ३९६४ जण क्वारंटाईन आहेत तर ८८४५ जण होम क्वारंटाईन आहेत.
जिल्ह्यात आता १९ कंटेनमेंट झोन
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) पुन्हा तीन नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली असून हा आकडा आता १९ वर पोहचला आहे. यात गोंदिया तालुक्यात नवरगाव कला, कटंगी, परसवाडा, सालेकसा तालुक्यात धनसुवा, सडक अर्जुनी तालुक्यात तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली. गोरेगाव तालुक्यात गणखैरा, गोरेगाव येथील भंगाराम चौक, आंबेतलाव,तिरोडा तालुक्यात तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यात करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे.

Web Title: A little joy to the people of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.