आता रेशनकार्डवर मिळणार जीवनदायीचा लाभ

By Admin | Updated: May 24, 2014 23:44 IST2014-05-24T23:44:19+5:302014-05-24T23:44:19+5:30

दारिद्रय़रेषेंतर्गत नागरिकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून २९ नोव्हेंबर २0१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना

Lifecycle benefits now available on ration card | आता रेशनकार्डवर मिळणार जीवनदायीचा लाभ

आता रेशनकार्डवर मिळणार जीवनदायीचा लाभ

केशोरी : दारिद्रय़रेषेंतर्गत नागरिकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून २९ नोव्हेंबर २0१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी हा आहे. मात्र अजूनही कित्येक पात्र लाभार्थ्यांंंना जीवनदायी कार्ड प्राप्त होऊ शकले नाही. परिणामी कित्येक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड किंवा आधारकार्ड असल्याची खात्री पडल्यास या योजनेचा लाभ लाभार्थ्यांंंना देण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे.

नागपुरातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून शस्त्रक्रिया, औषधोपचार, आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांना कार्ड वाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती धरण्यात आली. परंतु अजूनही संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहिती अद्ययावत केली नाही. त्यामुळे एका कुटूंबातील नावे दुसर्‍या कुटुंबात गेल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे जीवनदायी योजनेपासून अनेकांना वंचित राहावे लाले. याची शासनाने दखल घेत अखेर रेशनकार्ड किंवा आधार कार्ड असेल अशांनादेखील सदर योजनेचा लाभ देण्यात याव्या, अशा सूचना सबंधितांना शासनाने दिल्या आहेत.

त्यामुळे आता रेशनकार्ड व आधारकार्ड असणार्‍यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळणार आहे. खासगी डॉक्टरांकडून या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचीही माहिती आहे.(वार्ताहर)

Web Title: Lifecycle benefits now available on ration card